मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, तसेच निर्माती क्रांती रेडकर तिच्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियाद्वारे अनेकदा चर्चेत असते. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकींचे मजेशीर व्हिडीओही पोस्ट करत असते. त्यांच्या अनेक करामती ती व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच क्रांतीने नुकताच आणखीन एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. क्रांतीने शेअर केलेला हा नवीन व्हिडीओ तिचा किंवा तिच्या लेकींचा नसून क्रांतीच्या पतीचा म्हणजेच समीर वानखेडे यांच्याबद्दलचा आहे. (Kranti Redkar Visited Husband Sameer Wankhede Old House)
क्रांतीने नुकतीच पती समीर वानखेडेंच्या मुंबईतील १०० वर्षे जुन्या घराला भेट दिली आणि या भेटीचा व जुन्या घराचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे, क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि या व्हिडीओसह तिने या घराबद्दल तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. क्रांतीने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “तर हे माझे पती समीर वानखेडे यांचे जन्मगाव आहे. हा ब्रिटिश बंगला जो १०० वर्षांपेक्षा जुना आहे आणि समीर यांनी आपल्या आयुष्याची २५ वर्षे येथे घालवली. आम्ही २० वर्षांनंतर येथे भेट दिली आणि हे घर पाहून माझे मन हेलावले”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध कन्नड अभिनेत्रीचे निधन, वयाच्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप, घरातच आढळला मृतदेह
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “इथे समीर यांच्या आई वडील व बहिनीबरोबरच्या लहानपणापासूनच्या कितीतरी सुंदर आठवणी होत्या… ही जागा शुद्ध सोन्याची आहे, पण आता ती पुसून नवीन बांधकाम होणार आहे. नवीन इमारती नवीन लोक. हाच जीवनाचा नियम आहे. पण समीर त्यांच्या या ठिकाणाबद्दल जेव्हा जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील चमक जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यापेक्षाही उजळ असते. बाय बाय घर…”
दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अत्यंत जुन्या मोडकळीस आलेल्या घराची अवस्था दिसत आहे, या घराला झाडा-झुडपांनी अक्षरश: वेढलेले आहे. कौलारु व मोठं असलेलं घर पाडून आता तिथे नवीन वस्ती उभारली जाणार आहे आणि काही नवीन लोक तिथे राहायला येणार आहेत. त्यामुळे क्रांतीने तिच्या नवऱ्याच्या या जुन्या वास्तूलं कायमचे आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे आणि त्याची शेवटची झलकही तिने आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.