बॉलीवूड अभिनेता पंकज त्रिपाठीच्या मेहुण्याचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. पंकज त्रिपाठी यांची बहीण सबिता हिचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सबिताला धनबादच्या SNMMCH रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंकज त्रिपाठी यांची बहीण व मेहुणे बिहारमधील गोपालगंज येथून गाडीने कोलकाता येथे निघाले होते. दुपारी ३ ते ३ :३० च्या दरम्यान झारखंडच्या धनबादच्या निरसा येथे त्यांची कार नियंत्रणाबाहेर गेली आणि एनएचवर दुभाजकावर आदळली. (Pankaj Tripathi sister accident)
कारची धडक इतकी भीषण होती की, कारचे समोरून दोन भाग झाले. या अपघातानंतर स्थानिक लोकांनी दोघांनाही गाडीतून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत राजेश तिवारी यांचा मृत्यू झाला होता. तर पंकज त्रिपाठी यांची बहीण सबिता यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना SNMMCH या रुग्णालयात नेले. येथील डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
Actor Pankaj Tripathi's brother-in-law Rakesh Tiwari died in a road accident. Pankaj Tripathi's sister was injured in this accident.
— Angry Saffron (@AngrySaffron) April 21, 2024
According to the police, the accident occurred on the Delhi-Kolkata National Highway-2 at Nirsa Bazaar when Pankaj Tripathi's brother-in-law's car… pic.twitter.com/ZTqJCZrxz5
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश तिवारी स्वतः कार चालवत होते. SNMMCH डॉक्टरांनी सांगितले की, घटनेनंतर रुग्णाला रुग्णालयात आणले असता तिच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या, त्यामुळे सबिताचे सीटी स्कॅन करण्यात आले. सिटी स्कॅनद्वारे सबिताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. रुग्णाची प्रकृती गंभीर असली तरी ठीक आहे. मात्र रुग्णाला चांगल्या रुग्णालयात नेण्याबाबत त्याचे कुटुंबीय बोलत असून, कुटुंबातील सदस्य जो काही निर्णय घेतील त्याच्याशी हॉस्पिटल सहमत आहे.
सध्या डॉक्टरांचे पथक रुग्णावर लक्ष ठेवून आहे. राजेश तिवारी यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, राजेश तिवारी आणि त्यांची पत्नी सबिता तिवारी रस्त्यावर अपघातात जखमी झाल्याची बातमी त्यांना मिळाली. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पुढे, डॉक्टरांची एक टीम त्याच्या उपचारात व्यस्त होती. बॉलिवूड अभिनेता आणि सबिता तिवारीचा भाऊ पंकज त्रिपाठी यालाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली असून, कुटुंबातील सर्व सदस्य धनबादला रवाना झाले आहेत.