बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फॉलोअर्स वाढवण्यासाठी मीही…”, किशोरी शहाणेंनाही सोशल मीडिया फॉलोअर्सची चिंता, म्हणाल्या, “रील व्हिडीओही करते कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 30, 2024 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kishori Shahane On Social Media

"फॉलोअर्स वाढवण्यासाठी मीही…", किशोरी शहाणेंनाही सोशल मीडिया फॉलोअर्सची चिंता, म्हणाल्या, "रील व्हिडीओही करते कारण…"

‘प्रेम करु या खुल्लम खुल्ला’ या चित्रपटाचं मराठी कलाविश्वामध्ये अढळ स्थान आहे. याच चित्रपटामुळे मराठी कलाविश्वाला किशोरी शहाणे हा नवा चेहरा मिळाला. वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी पहिला चित्रपट करणाऱ्या अभिनेत्रीने केवळ मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक मिळविला. किशोरी यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने व नृत्यशैलीने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. किशोरी या त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात . (Kishori Shahane On Social Media)

अशातच ‘झी युवा’च्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या पोस्टमध्ये किशोरी शहाणे यांची मुलाखत समोर आली आहे. यावेळी बोलताना किशोरी यांनी फॉलोअर्सची संख्या अधिक असणाऱ्यांना मिळणार प्राधान्य कितपत योग्य आहे याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी किशोरी यांना, आजकाल एक ट्रेंड निघाला आहे की, ज्यांना सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत त्यांना पटकन काम मिळतं, ही गोष्ट किती खरी आहे आणि ऑडिशन न घेता केवळ फॉलोअर्सच्या संख्येवर तुम्हाला संधी दिली जाते?”, असा प्रश्न विचारला.

आणखी वाचा – “सहकार्य करणारे कलाकार खूप कमी आणि…”, भार्गवी चिरमुलेबरोबरचा फोटो शेअर करत प्रसाद खांडेकरची पोस्ट, म्हणाला, “पहाटे शिफ्ट संपते तेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by Zee Yuva (@zeeyuva)

या प्रश्नाचं उत्तर देत किशोरी शहाणे म्हणाल्या, “हे खरं नाही. टॅलेंट हे आवश्यक आहे. स्क्रीनवर काम करताना तुमच्या डोळ्यातले भाव प्रेक्षकांना भावले तर तो खरा अभिनय, तर तुम्ही टिकू शकता. फॉलोअर्स अधिक असल्याने सुरुवातीला तुम्हाला काम करण्याची संधी नक्कीच मिळेल. पण सिनेसृष्टीतील लांबच्या प्रवासासाठी, लांब उडी घेण्यासाठी फॉलोअर्स अधिक असणं गरजेचं नाही. पण हेही खरं आहे की, फॉलोअर्सच्या संख्येत वाढ करणं आवश्यक आहे. माझं सुद्धा इंस्टाग्राम अकाऊंट आहे. मी सुद्धा फॉलोअर्स वाढण्यासाठी रील व्हिडीओ पोस्ट करत असते”.

आणखी वाचा – “देवीच्या फोटोचा केक कापणार?”, ‘सातव्या मुलीची…’च्या टीमने केक कापताच प्रेक्षकाने विचारला प्रश्न, झी मराठीची टीम म्हणाली, “त्रिनयना देवी…”

किशोरी यांनी हिंदी तसेच मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण काम करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ‘घर एक मंदिर’, ‘ जस्सी जैसी कोई नही’, ‘सिंदूर’ या हिंदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ हे मराठी चित्रपट तुफान लोकप्रिय झाले.

Tags: entertainmentkishori shahaneKishori Shahane On Social Mediamarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Atharva Sudame Lifestyle

कंटेन्ट क्रिएटरपूर्वी 'हे' काम करायचा अथर्व सुदामे, आता सोशल मीडियामधून कमावतो इतके पैसे, म्हणाला, "माझ्याकडे पैसा आहे म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.