इंग्रजी भाषा बोलता न येणे आणि यामुळे न्यूनगंड येणे हे प्रत्येक मराठी माणसाबरोबर होतंच. पण तरीही इंग्रजी भाषा बोलता न येण्याचा न्यूनगंड अजिबात न बाळगता केवळ आपल्या अभिनयाच्या हिंमतीवर एका अभिनेत्रीने हॉलिवूडमध्ये आपली मराठी पताका फडकावली आहे आणि ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे छाया कदम. ‘फॅंड्री’, ‘सैराट’, ‘न्युड’, ‘रेडू’, ‘सरला एक कोटी’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांसह ‘झुंड’ व ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘लापता लेडीज’ अशा बॉलीवूड चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या अभिनयाची ‘छाया’ सर्वांवर पाडली आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या छाया कदम नुकत्याच त्यांच्या ‘कान्स’मधील गौरवाने पुन्हा एकदा चर्चेत आल्या.
यंदाच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये तब्बल तीन दशकांनी ‘All We Imagine As Light’ या भारतीय चित्रपटाला नामांकन मिळालं. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीत पाल्मे डी’ओर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या या चित्रपटाचा कान्स चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला आणि त्यांच्या ‘All We Imagine As Light’ या चित्रपटाचा प्रीमियर संपल्यानंतर उपस्थितांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. टाळ्यांच्या कडकडाटात सर्वांनी अभिनेत्रीचे कौतुक केले. या कान्स फेस्टिव्हलनंतर छाया कदम यांनी पहिल्यांदाच ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला.
आणखी वाचा – शुक्रवारी मेष व कुंभसह ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, तुमच्यासाठी दिवस नेमका कसा?, जाणून घ्या…
यावेळी त्यांना इंग्रजी भाषा बोलता न येण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत छाया कदम यांनी असं म्हटलं की, “मला आधीपासूनच इंग्रजीची भीती होती. पण आता मला असं वाटतं की, मला नाही येत इंग्रजी भाषा बोलता तर ठीक आहे. मला माझं काम इथपर्यंत घेऊन आलं आहे. मला किती छान इंग्रजी बोलता येतं यासाठी मला कान्समध्ये बोलावलं नसून मला माझ्या कामासाठी व माझ्या चित्रपटासाठी इथं बोलावलं गेलं आहे. तरीही मी तिथे जाऊन तोडकं मोडकं इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करायचे. पण ते लोकंही फ्रेंच भाषा बोलतात तर त्यांनाही इंग्रजी बोलता येत नव्हतं. तर मी त्यांना गंमतीने You Don’t know English (तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही) असं म्हणायचे.
आणखी वाचा – देवीआईच्या लेकींच्या हाती पाचवी पेटी, पेटीमध्ये विरोचकाला मारण्याचे ‘ते’ शस्त्र, अखेर रुपालीचा अंत होणार
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “मला आता या कान्स फेस्टिव्हलनंतर आत्मविश्वास आला आहे. माज नाही म्हणता येणार पण स्वत:बद्दल आत्मविश्वास वाटत आहे. मी तिथल्या लोकांबरोबर हिंदी काय तर मराठीत पण बोलायचे. मला इंग्रजी भाषा नाही बोलता येत संपला विषय. तुम्हाला समजून घ्यायचे आहे तर तुम्ही समजून घ्या.