शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, पूजाही केली, संपूर्ण झलक दाखवली अन्…; म्हणाली, “बदलापूरचं घर गाठायचे तेव्हा…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2023 | 9:40 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress ashwini kasar shared news of her new house from her instagram video viral on social media

Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, पूजाही केली, संपूर्ण झलक दाखवली अन्...; म्हणाली, "बदलापूरचं घर गाठायचे तेव्हा..."

मुंबईत स्वत:चे घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो. गेल्या काही दिवसांत मराठीतील अनेक कलाकारांनी मुंबईत त्यांचं स्वत:चं घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केली आहे. रुचिता जाधव, पृथ्वीक प्रताप, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, केतकी माटेगांवकर, ऋतुजा बागवे यांनी नवीन घर घेतल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. अशातच अभिनेत्री अश्विनी कासारनेही मुंबईत तिचं स्वत:चं नवीन घर घेतलं आहे. नुकताच तिने तिच्या नवीन घराचा एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. (Ashwini Kasar On Instagram)

नवीन घराच्या खरेदीचे काही खास क्षण शेअर करत तिने या व्हिडीओखाली तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यात तिने असं म्हटले आहे की, “आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे व काम करत आहोत त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं. हे एक स्वप्न आहे. आणि कधी काळी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे. त्यामुळे आता माझ्या मनात खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी हा आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच करत आहे. काही वर्षांपूर्वी बदलापूरपासून सुरु झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी मी घरी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी मला कधीच घराची उणीव जाणवू दिली नाही. या सर्वांनी मला नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे.”

View this post on Instagram

A post shared by Ashwini Kasar (@ashwinikasar18)

आणखी वाचा – Video : क्रांती रेडकरच्या लेकींची नवी करामत, गाडी चालवत असताना ड्रायव्हरलाच हेअरबँड घातला अन्…; व्हिडीओ व्हायरल

यापूढे तिने असं म्हटलं आहे की, “आज मला मी रात्री-बेरात्री केलेले प्रवास, माझ्या तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू व हसू हे सगळं मला आता आठवत आहे. हे सगळं मला मौल्यवान वाटत आहे. या घराने आता आणखी कंबर कसून आणखी जास्त काम करण्याची ताकद दिली आहे. ‘मुंबई’ने आपलं म्हटल्याची भावना आता वाटत आहे. माझ्या घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा व महाराष्ट्र शासनाचेही आभार. तसेच तुम्हा सर्वांचे आशीर्वाद व प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी व माझं घर कायम असू. भावना समजून घ्याल याची खात्री आहे.”

आणखी वाचा – नातीचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी जया बच्चन आल्याच नाहीत, श्वेता बच्चनचीही गैरहजेरी, कौटुंबिक वाद विकोपाला गेला असल्याची चर्चा

दरम्यान, अश्विनीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. मराठीतील अनेक कलाकारांनी तिला कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अपूर्वा गोरे, साक्षी गांधी, माधवी नेमकर, रुपल आनंद यांसारख्या अनेक कलाकार मंडळींनी तिला कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अश्विनीच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये तिला तिच्या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: ashwini kasarentertainmententertainment newsmarathi actressmarathi entertainmentMarathi news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Ashvini Mahangade Post

Video : “देवांनी सांगावा धाडला अन्…”, जेजुरी गडावर पोहोचली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, म्हणाली, "देवाने अजून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.