आपल्या अभिनयाने व उत्तम नृत्यशैलीने क्रांती रेडकर हिने मराठी सिनेसृष्टीमध्ये स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. क्रांती कायमच सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर क्रांती नेहमीच सक्रिय असते ट्रेंडिंग रील्स शेअर करत ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत असते. विशेषतः ती त्यांच्या लेकींमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर क्रांती तिच्या मुलींबरोबर धमाल मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. (Kranti Redkar On Instagram)
क्रांती लेकींच्या वेगवेगळ्या करामतींचे व्हिडीओ तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्या कायम वेगवेगळ्या करामती करतच असतात. अशातच तिच्या लेकींनी आणखी एक नवीन करामत केली आहे. त्यांचा या नवीन करामतीचा व्हिडीओ क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे आणि या व्हिडीओची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
या व्हिडीओमध्ये क्रांतीच्या लेकी शाळा सुटून घरी जात असताना त्यांनी त्यांच्या केसांचा हेअरबॅंड ड्रायव्हरला लावत आहेत. त्याचबरोबर ड्रायव्हर गाडी चालवत असताना त्यांनी व्यत्यय आणल्यामुळे त्या त्यांना सॉरीदेखील म्हणतात. त्यानंतर त्या दोघी क्रांतीलाही हेअरबॅंड लावतात आणि क्रांतीही तो हेअरबॅंड लावून घेते. माय-लेकींची ही मज्जामस्ती चाहत्यांनादेखील भलतीच आवडली आहे.
दरम्यान, क्रांतीने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. “शाळा सुटल्यानंतरचे प्रयोग” असं कॅप्शन देत क्रांतीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत या व्हिडीओला चंगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये क्रांतीच्या लेकींचं कौतुक केलं आहे.