‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत शेवंताची भूमिका साकारली होती. तिने साकारलं हे पात्र प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं. या लोकप्रिय मालिकेनंतर अपूर्वा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, या मालिकेत अभिनेत्री सावनी हे पात्र साकारत आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी अपूर्वा सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर आपल्या खाजगी आयुष्याबद्दलच्याही अनेक गोष्टी शेअर करते. (Apurva Nemlekar Emotional Post)
अपूर्वा ‘बिग बॉस मराठी’ सीजन ४ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेली. या सीझनची ती उपविजेती ठरली. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यावरच काही महिन्यांनी तिच्या भावाचे दुःखद निधन झाले. त्यामुळे ती खूपच एकटी पडलेली. अनेकदा सोशल मीडियावर ती आपल्या भावाच्या आठवणी शेअर करायची. तसंच ‘बिग बॉस’च्या घरात असताना अपूर्वाने वडील गेल्यानंतरच्या काही भावुक आठवणीसुद्धा शेअर केल्या होत्या. अशातच तिने पुन्हा एकदा वडील आणि भावाच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे. अपूर्वाने स्वत: धीर देणारी एक पोस्ट लिहिली आहे. अपूर्वाने इन्स्टाग्रामवर वडील व भाऊबरोबरचे फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली आहे.
आणखी वाचा – महाराष्ट्राचे ‘भूषण’ आता छोटा पडदा गाजवणार! अशोक सराफ यांची नवीन मालिका, भूमिका आहे फारच खास
या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “प्रिय मी स्वत, मला माहित आहे की आज हे माझ्यासाठी सोपे नव्हते. पण कृपया मला कसे वाटते हे मला सांगू नका, जोपर्यंत मी हे मान्य करत नाही की, पप्पा आणि भाई आता आमच्यात नाहीत, माझे तुटलेले हृदय बरे होईल असे सांगू नका. कारण ते खरे नाही, कृपया मला सांगू नका की, माझे पप्पा आणि भाई चांगल्या ठिकाणी आहेत. हे खरे असले तरी मला ते इथे माझ्याबरोबर हवे आहेत. मला सांग ना मला कधीतरी त्यांचा आवाज ऐकू येईल आणि त्यांचे चेहरे दिसतील. आजच्या पलीकडे मी पाहू शकत नाही, मला सांगू नका की, पुढे जाण्याची वेळ आली आहे, कारण मी करू शकत नाही, ते गेले या वस्तुस्थितीचा सामना करण्यास मला सांगू नका, कारण ही अशी गोष्ट आहे जी मी थांबवू शकत नाही”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “मी त्यांच्याबरोबर मिळालेल्या वेळेबद्दल आभार मानायला हवेत, कारण मला तो आणखी हवा होता. मला सांगू नका की, मी पूर्वीसारखी कधीच राहणार नाही. तू मला काय सांगू शकतोस तू माझ्यासाठी इथे असशील, जेव्हा मी पप्पा आणि भाईबद्दल बोलेन तेव्हा तुम्ही ऐकाल. माझ्या अनमोल आठवणी तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. तुम्ही माझ्याबरोबर थोडावेळ रडू देखील शकता आणि कृपया त्यांचे नाव घेण्यास अजिबात संकोच करू नका, कारण ते मला दररोज ऐकण्याची खूप इच्छा आहे. माझ्या प्रिय स्वत: ला कृपया लक्षात घे की मी कधीही सारखी असू शकत नाही, परंतु जर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात तर, मी एखाद्या दिवशी बनलेली नवीन व्यक्ती तुम्हाला आवडेल”.