शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुम्हाला किडनॅप करतील आणि…”, भारतात खूप जास्त सुखी म्हणत अमृता खानविलकरने सांगितली भयंकर घटना, म्हणाली, “बंदुक घेऊन लोक…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 11, 2024 | 12:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Khanvilkar Incident

"तुम्हाला किडनॅप करतील आणि…", भारतात खूप जास्त सुखी म्हणत अमृता खानविलकरने सांगितली भयंकर घटना, म्हणाली, "बंदुक घेऊन लोक…"

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मानवर राज्य केलं. मालिका, चित्रपट, वेबसीरिजच्या माध्यमातून अमृताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अमृताच्या सौंदर्याचे तर लाखो दिवाने चाहते आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही अमृताने आपल्या अभिनयाच्या जोरावर छाप पाडली. सोशल मिडियावरही अमृता नेहमीच सक्रिय असते. अशातच अमृता सध्या तिच्या ‘लुटेरे’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. (Amruta Khanvilkar Incident)

या वेबसीरिजच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. अमृताने मिड डेला दिलेल्या मुलाखतीत एक भयावह किस्सा सांगितला आहे. हा किस्सा सांगत अमृता म्हणाली, “दक्षिण आफ्रिकेत आम्ही ज्या ठिकाणी चित्रीकरण करत होतो ती जागा म्हणजे पृथ्वीवरचा सर्वात मोठा स्लम एरिया होता. जसा धारावी परिसर आपल्या आशियात सर्वात मोठा आहे, अगदी तसाच दक्षिण आफ्रिकेतील तो भाग पृथ्वीवरची सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखला जातो”.

आणखी वाचा – वादळी वारा अन् गारांचा पाऊस तरीही…; वर्ध्यातील प्रथमेश लघाटेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी, भारावून गेला, म्हणाला, “पहाटे ५ वाजता…”

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृता पुढे म्हणाली, “तेथील आफ्रिकन लोकसुद्धा बंदुका घेऊन फिरत होती. माझा चित्रीकरणाचा पहिलाच दिवस होता. मी व्हॅनमध्ये बसले होते आणि त्या व्हॅनच दार मी उघडं ठेवलं कारण, मला प्रचंड गरम होत होतं. तेवढ्यात सेटवरचा एक मुलगा पळत आला आणि म्हणाला, मॅडम तुम्ही प्लीज सगळं बंद करुन बसा. तुम्हाला इथून किडनॅप करुन घेऊन जातील आणि आम्ही काहीच करु शकणार नाही. आता हे सांगणं खूप सोपं आहे. पण, तेव्हा माझ्या मनात खरंच एक भीती निर्माण झाली होती”.

आणखी वाचा – नेत्राच्या हातून अस्तिकाचा अंत, अस्तिकाच्या मृत्यूने विरोचकालाही धक्का, मालिकेला नवीन वळण, आता पुढे काय घडणार?

अभिनेत्री पुढे म्हणाली, “करोनादरम्यान आमचं चित्रीकरण सुरु असल्याने तेव्हा तिथेही आर्थिक चणचण होती. अगदी अलीकडच्या काळात आफ्रिकेतील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्या भागात माफिया, गुन्हेगारी, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. अशा ठिकाणी चित्रीकरण करण्याचा अनुभव काहीतरी वेगळाच होता. कारण, आपण भारतात खरंच खूप जास्त सुखी आहोत. आपल्याला जे पाहिजे ते आपण बोलू शकतो, आपल्याला हवं तिथे फिरु शकतो पण त्या ठिकाणी एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या”, असंही ती म्हणाली.

Tags: amruta khanvilkarAmruta Khanvilkar Incidententertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Sankarshan Karhade shared the story of his fan through special post on social media

आधी संकर्षण कऱ्हाडेच्या प्रेमात, मुल झाल्यानंतर त्याच्याच नावावरुन ठेवलं मुलाचं नाव; अभिनेता म्हणाला, "मुलाला ठेवून मला भेटायला आली अन्..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.