रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ज्यांनी आधी लीड केलंय तेच चॅनेलला हवेत”, अमृता देशमुखने सांगितलं मालिकाविश्वाचं काळ सत्य, म्हणाली, “नवीन प्रोजेक्ट येण्याआधी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 23, 2025 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amruta Deshmukh On Casting

"ज्यांनी आधी लीड केलंय तेच चॅनेलला हवेत", अमृता देशमुखने सांगितलं मालिकाविश्वाचं काळ सत्य, म्हणाली, "नवीन प्रोजेक्ट येण्याआधी…"

Amruta Deshmukh On Casting : टेलिव्हिजन विश्व हे नेहमीच प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करतं. टेलिव्हिजनवरील मालिका या नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कमी पडत नाहीत. अगदी सातच्या ठोक्याला प्रत्येक घरात मालिकांचे टायटल साँग लागलेले ऐकू येतात ते थेट १०-११ च्या सुमारास बंद होतात. महिलावर्गाचा तर हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बरं या सगळ्यात मालिकांचा टीआरपी तर नेहमीच चर्चेत असतो. मालिकांच्या टीआरपी मालिकाविश्वात बरेचदा महत्त्वाचे ठरतात. या मालिका टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. या सगळ्याला कलाकारांच्या भूमिका, अभिनय जबाबदार ठरतात.

टेलिव्हिजन विश्वात बरेचदा मालिकाविश्वातील तेच तेच चेहरे पाहायला मिळतात. कारण एकेकाळी या चेहऱ्यांमुळेच या मालिकांनी टीआरपीची शर्यत गाजवलेली असते. हे चेहरे हळूहळू प्रेक्षकांच्याही मनाचा ठाव घेतात. प्रेक्षकांनाही कालांतराने मालिकांमध्ये तेच चेहरे पाहण्याची सवय होते. त्यामुळे मालिकाविश्वातील कास्टिंग हा एक नेहमीच वादाचा मुद्दा ठरला आहे. या प्रकरणावर अनेक कलाकारांनी आपली मत मांडली आहेत. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने या प्रकरणावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. आणि मालिकाविश्वातील कास्टिंगला टोकलं आहे.

आणखी वाचा – घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याच्या चर्चांनंतर गोविंदाच्या पत्नीचा जुना व्हिडीओ व्हायरल, त्याने साखरपुडाही मोडलेला…

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

अभिनेत्री अमृता देशमुख नेहमीच स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते. ती तिच्या युट्युबवर व्हिडीओ शेअर करत नेहमीच न पटलेल्या मुद्द्यांवर सडेतोडपणे भाष्य करते. अशातच अभिनेत्रीने आता शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिने चॅनेलच्या लोकांना एखाद्या प्रोजेक्टसाठी मुख्य भूमिकांत काम केलेलेच कलाकार हवे असतात हा मुद्दा मांडला आहे. या व्हिडीओमध्ये अमृता म्हणते, “कलाकाराच्या आयुष्यात ऑडिशन देणं हा प्रकार दात घासण्याइतका रोजचा असतो. पण माझ्या आयुष्यात तो वेदनादायी झाला आहे. कारण माझ्या आयुष्यात ऑडिशन प्रासंगिक आणि वेदनादायीच आहे. आणि याचे तीन-चार प्रकार आहेत”.

आणखी वाचा – “मी जिवंत आहे”, निधनाची खोटी बातमी देताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते भडकले, म्हणाले, “स्पष्टीकरण देऊनही…”

यापुढे ती पहिला प्रकार सांगत असं म्हणते, “जसं मलायका अरोरा जीमला जाताना तिच्या पाठीमागे पापाराझी धावतात. तसंच ज्या क्षणी मला कळतं की, एखाद्या चॅनेलवर नवीन प्रोजेक्ट येणार आहे. त्यानंतर लगेचच असं कळतं की, या प्रोजेक्टसाठी अगोदरच कास्टिंग झालेलं आहे. कुणाचं? तर माजी लीडचं (मुख्य)… म्हणजे एकतर दुसऱ्या चॅनेलवर त्यांनी मुख्य भूमिकेत काम केलेल असेल किंवा त्याच चॅनेलवर ज्यांनी मुख्य भूमिकांमध्ये काम केलं आहे”. यापुढे अमृता सांगते, “या लोकांना मासिक भिशी तत्त्वावर चॅनेलने थांबवून ठेवलेले असतं. कारण त्यांना तेच हवेत. या इच्छुक कलाकारांच्या महासागरात चॅनेलला इतर काही रत्न मिळालेली असतात, ती त्यांना जपून ठेवायची असतात. कारण या रत्नांशिवाय टीव्ही इंडस्ट्रीचा, डेलीसोपचा रत्नहार होऊच शकत नाही. नाहीतर तो हार विकलाच जाणार नाही”.

Tags: amruta deshmukhcasting issueTV audition struggles
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
aishwarya narkar business women

ऐश्वर्या नारकर, तितीक्षा आणि सुरुची…; मराठी अभिनेत्रींनी एकत्र येत सुरु केला नवा व्यवसाय, ब्रँडचं नाव आहे…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.