शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऐश्वर्या नारकर, तितीक्षा आणि सुरुची…; मराठी अभिनेत्रींनी एकत्र येत सुरु केला नवा व्यवसाय, ब्रँडचं नाव आहे…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 23, 2025 | 2:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
aishwarya narkar business women

ऐश्वर्या नारकर, तितीक्षा आणि सुरुची…; मराठी अभिनेत्रींनी एकत्र येत सुरु केला नवा व्यवसाय, ब्रँडचं नाव आहे…

aishwarya narkar business women : बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी अभिनयाबरोबरच जोडधंदा सुरु केलेला पाहायला मिळाला आहे. अनेक कलाकारांनी त्यांची अभिनयाची आवड जोपासत व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. कालच ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे हिने नवा व्यवसाय सुरु केला. कांतप्रिया असे तिच्या नव्या ज्वेलरी ब्रँडचे नाव असल्याचं तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं. याचबरोबर आता आणखी काही कलाकारांनी एकत्र येत नव्या व्यवसायाची गुडन्यूज दिली. या अभिनेत्रींनी एकेकाळी मालिकाविश्व गाजवलं, आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी ऑफस्क्रीन एकत्र येत व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे.

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसलेल्या तितिक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर या अभिनेत्रींनी मालिकेचा निरोप घेतल्यानंतर एकत्र येत साड्यांचा नवा व्यवसाय सुरु केला आहे. काल त्यांनी सोशल मीडियावर एकत्र एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या या नव्या व्यवसायाबाबत, त्यांच्या या नव्या ब्रँडबाबत माहिती दिली. ऐश्वर्या, तितीक्षा आणि सुरुची यांच्या नव्या ब्रँडचे नाव ‘थ्रेड अँड ठुमका बाय tasvi’ असे आहे.

आणखी वाचा – लाकडी थीम, गुप्त खोल्या, १०० कॅमेरे अन्…; Bigg Boss 19 च्या घराची पहिली झलक, फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by TASvi (@threadandthumka)

या ब्रँड बाबत माहिती देत तिघींनी एकत्र येत एक व्हिडीओ शेअर केला आहे. यांत त्यांनी असं म्हटलं आहे की, “आजवर तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या माध्यमांतून बघत आलेले आहात. विविध मालिकांमध्ये तुम्ही आम्हाला पाहिलंय आणि आमच्यावर तुम्ही कायम भरभरुन प्रेम केले आहे. त्यामुळे तुमच्याबरोबर एक आनंदाची बातमी शेअर करतोय आज आम्ही आमचा ब्रँड लाँच करत आहोत. आमच्या बँडचे नाव आहे ‘थ्रेड अँड ठुमका बाय tasvi’ आम्ही खास तुमच्यासाठी खूप सुंदर साड्या घेऊन येत आहोत आणि या सगळ्या साड्या तुम्हाला आमच्या ब्रँडच्या पेजवर पाहायला मिळतील”.

आणखी वाचा – “मी जिवंत आहे”, निधनाची खोटी बातमी देताच सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते भडकले, म्हणाले, “स्पष्टीकरण देऊनही…”

सेटवरील अभिनेत्रींची ही मैत्री आता व्यवसाय क्षेत्रात एकत्र येत प्रोफेशनलही झाली आहे. त्यांच्या या एकत्रित येत घेतलेल्या निर्णयाचं सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून कौतुक करण्यात येत आहे. ऐश्वर्या, तितीक्षा आणि सुरुची यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.

Tags: aishwarya narkarmarathi actressnew business
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Next Post
Monika Dabde News

प्रेग्नन्सीमध्ये पूर्णा आजींनी घेतलेली मोनिका काळजी, खास पदार्थही बनवून आणलेला आणि…; अभिनेत्रीने दाखवली रेसिपी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.