शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वैभव मांगलेंच्या लेकीने पहिल्यांदाचं बनवला संपूर्ण स्वयंपाक, अभिमानाने म्हणाले, “लवकरच माझा मुलगाही…”

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 2, 2024 | 10:34 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Vaibhav Mangle shared a proud post on his daughter cooking for the first time.

वैभव मांगलेंच्या लेकीने पहिल्यांदाचं बनवला संपूर्ण स्वयंपाक, अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना...

अभिनेते वैभव मांगले हे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. मालिका, नाटक, चित्रपट या सगळ्या माध्यमांमध्ये वैभव मांगले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. उत्तम अभिनयाबरोबर वैभव मांगले त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जातात. वैभव मांगले सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते विविध पोस्ट शेअर करत त्यांची मतं व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी नुकतीच त्यांच्या मुलीबद्दलची एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. मुलीचं कौतुक करणारी ही पोस्ट असून यामध्ये त्यांनी मुलीबद्दल अभिमान असल्याचंदेखील म्हटलं आहे. (Vaibhav Mangle Daughter Cooking)

कोणत्याही बापासाठी त्यांच्या मुलांनी आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी नवीन साध्य केल्याबद्दल आनंद व अनिमान असतो. मग ती शैक्षणिक प्रगती असो, एखाद्या खेळात बक्षीस जिंकणं असो किंवा पहिल्यांदा साग्रसंगीत जेवण बनवणं असो. प्रत्येक बापाला मुलाने साध्य केलेल्या प्रत्येक गोष्टीचा अभिमान असतो. असाच अभिमान अभिनेते वैभव मांगले यांनी आपल्या लेकीबद्दल व्यक्त केला आहे. वैभव यांच्या मुलीने पहिल्यांदा जेवण केलं असून याबद्दल त्यांनी खास अभिमानास्पद पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by vaibhav mangale (@vaibhavmangale)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : सूरज-जान्हवीने केली निक्की-अरबाजची नक्कल, डीपीनेही दिली साथ, इतर स्पर्धकांना हसू अनावर

या पोस्टमध्ये वैभव यांनी असं म्हटलं आहे की, “आज पहिल्यांदा माझ्या मुलीने पौलोमीने सगळा स्वयंपाक तयार केला. कोबी फ्लॉवर बटर मसाला, चपाती, भाकरी, भात आणि वरण. खूप अभिमान वाटला. लवकरच माझा मुलगा ही स्वयंपाक करायला लागेल”. या पोस्टसह त्यांनी लेकीचा फोटोदेखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये टेबलवर सर्व जेवण ठेवलं असल्याचं पाहायला मिळत आहे. वैभव यांनी शेअर केलेल्या या पोस्टला त्यांच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. अनेक नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांचाही समावेश आहे.

आणखी वाचा – 02 September Horoscope : ‘या’ राशींसाठी सोमवारचा दिवस भाग्याचा, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रात मिळणार यश, नेमकं नशिबात काय? जाणून घ्या…

वैभव मांगले हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय राहतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांसह विविध फोटो व व्हिडीओ शेअर करतात.  दरम्यान,  वैभव यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. शिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’ ही मालिका व ‘टाईमपास’सारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत    

Tags: vaibhav mangleVaibhav Mangle DaughterVaibhav Mangle Daughter Cooking
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
kangana ranaut on jaya bachchan

“त्यांना पॅनिक अटॅक येतो आणि...”, जया बच्चन यांच्यावर कंगना रणौतची सडकून टीका, म्हणाली, “लाजिरवाणी गोष्ट की...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.