nilesh sabale and sharad upadhye controversy news : सुप्रसिद्ध राशिचक्रकार शरद उपाध्ये यांनी डॉ. निलेश साबळे यांच्यावर केलेल्या आरोप प्रत्यारोपाने सोशल मीडियावर खळबळ पसरवली. उपाध्येंनी निलेश यांच्यावर केलेली टीका स्वतः अभिनेते, दिग्दर्शक निलेश यांनी खोडून काढली. निलेश साबळे यांनी थेट सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत उपाध्येंनी केलेले आरोप अगदी मुद्देसूद मांडत आपलं मत व्यक्त केलं. निलेश यांच्या या व्हिडीओनंतर अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला. प्रेक्षकांनीही त्याच्या पोस्टखाली कमेंट करत त्याला सपोर्ट केला. अशातच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अभिनेते स्वप्नील राजशेखर यांनी थेट पोस्ट शेअर करत निलेश यांना पाठिंबा दिला आहे, तर उपाध्येंची चांगलीच कानउघडणी केली आहे.
स्वप्नील यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “या प्रकरणात, उपाध्येंना ज्या पध्दतीच्या अटेंशनची सवय वर्षानुवर्षे लागली असेल तसं आणि त्या प्रमाणात अटेंशन ‘झी’च्या त्या सेटअपमध्ये न मिळणं हे सुध्दा या सगळ्याचं मूळ असू शकेल. ‘चला हवा येऊ द्या’ हा वर्षानुवर्षे निलेश साबळेचा बराचसा एकखांबी तंबु राहिला आहे. लेखन, दिग्दर्शन, सुत्रसंचालन अशा त्यातल्या महत्वाच्या क्रिएटिव्ह बाजू एकत्रीत संभाळतात. त्यातल्या अभिनेत्याना तालीम आणि सादरीकरण हे काम असतं. त्यामुळे कदाचित त्यांना शुटींग दरम्यान रिकामा वेळ मिळु शकेल. पण लेखक, दिग्दर्शक आणि सुत्रसंचालक म्हणजे एकाअर्थी त्या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा असणाऱ्या निलेश साबळेला तितका फावला वेळ सेटवर मिळण्याची आणि त्याने सतत हसऱ्या चेहऱ्याने ऑफ़स्क्रीन सर्वाना अटेंड करत वावरत असण्याची अपेक्षा करणं हेच चुकीचं आहे”.
आणखी वाचा – “आमच्या घराण्यात तुमची भक्ती कोणीच केली नव्हती”, केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “श्वासाचा शेवट…”
पुढे ते म्हणाले, “त्याला टेंशन किती असेल याची कल्पना कुणालाही करता येऊ शकते. पण उपाध्येंना या माध्यमाची माहिती आणि सवय नसल्याने ते स्वतः सहसा एकपात्री सादरीकरणात असल्याने त्यांची गफलत झालेली असावी. तरीही, दहा वर्षे मनात राग साठवुन राहणे आणि तो असा जाहिर व्यक्त करणे हे उपाध्येंसारख्या वयोवृद्धाकडून मुळीच अपेक्षित नाही. शिवाय समजा, खरच जर उपाध्येंचा समज झाला तसं निलेश साबळेला वगळून तो कार्यक्रम सुरु होत असता, (जे खरं नाही हे निलेशनी आपल्या व्हिडीओतून सांगितलं आहेच) तर ते निलेश साबळेसाठी आनंदाचं नक्की नसतं. अशावेळी ‘बरं झालं, डच्चु दिला’ वगैरे पध्दतीने व्यक्त होणं हे सभ्यतेला धरुनही नव्हे”.
आणखी वाचा – “कार्तिक आर्यनाचाही सुशांत सिंह राजपूत होणार”, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाचा धक्कादायक दावा, काळं सत्य समोर
शेवटी अभिनेते म्हणाले, “तस्मात माझ्या मते, उपाध्येंचा राशीयोग या दोन तीन दिवसात काही बरा नव्हता”. अभिनेत्याची निलेश यांच्या समर्थनार्थ असलेली ही पोस्ट सध्या साऱ्यांच्या पसंतीस पडली आहे. आणि सोशल मीडियावर तुफान व्हायरलही होत आहे.





