रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कॉमन सेन्सचा दुष्काळ”, ट्रॅफिकमध्ये अडकताच मराठी अभिनेत्याचा संताप, भीषण परिस्थिती दाखवत म्हणाला, “वाहतूक विभागाला…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 26, 2025 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
sumeet raghvan shares video about traffic

"कॉमन सेन्सचा दुष्काळ", ट्रॅफिकमध्ये अडकताच मराठी अभिनेत्याचा संताप, भीषण परिस्थिती दाखवत म्हणाला, "वाहतूक विभागाला…"

sumeet raghvan shares video about traffic : सध्या सर्वत्र ट्रॅफिकमुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीच्या त्रासाने घेरलं आहे. मुंबई-पुणे सारख्या शहरांत वाहतूक कोंडीचा जबर सामना प्रवाशांना करावा लागत आहे. प्रत्येक सर्वसामान्य माणूस या नेहमीच्या ट्रॅफिकच्या त्रासाला वैतागला आहे. याचबरोबर अनेक कलाकारही या नेहमीच्या वाहतूक कोंडीला त्रासले आहेत. सेटवर जाताना, शूटला जाताना वा एखाद्या कार्यक्रमाला जाताना नेहमीच या कलाकारांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. बरेचदा ही कलाकार मंडळी हा राग सोशल मीडियाद्वारे व्यक्तही करतात. काही दिवसांपूर्वीच अभिनेता आस्ताद काळेने ठाणे घोडबंदर रोडवरील वाईट अवस्था आणि ट्रॅफिकबाबत आवाज उठविला.

यानंतर आता अभिनेता सुमित राघवननेही अशाच त्रासाला सामोरे जाण्यावरुन संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर सुमित बऱ्यापैकी सक्रिय असतो, नेहमीच तो काही ना काही शेअर करत वा स्पष्टपणे न पटलेल्या मुद्द्यांवर भाष्य करताना दिसतो. अशातच सुमितने इंस्टाग्राम अकाउंटवर मुंबईतील ट्रॅफिकची भीषण परिस्थिती दाखविली आहे. शिवाय या वाहतूक कोंडीदरम्याम त्याने शेंगदाणा विक्रेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. “हा आता ब्रिजवरसुद्धा दिसायला लागला आहे, कमाल आहे”, असं त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा – सुखी, वैवाहिक आयुष्यासाठी करा हरतालिकेचे व्रत, जाणून घ्या या व्रतामागची कथा आणि शुभ मुहूर्त

View this post on Instagram

A post shared by Sumeet Raghvan (@sumeetraghvan)

पुढे व्हिडीओमधून त्याने ब्रिजवरील प्रचंड वाहतूक कोंडीची दृश्ये दाखवली आहेत. आणि असं म्हटलं आहे की, “बांद्रावरुन सांताक्रूझच्या दिशेने उतरणारा पूल, त्यावरुन जे ट्रॅफिक खाली उतरतं ते, तसंच ब्रिजवरील खाली उतरणारे ट्रैफिक आणि सांताक्रूझ स्टेशनच्या दिशेने खालून येणारं ट्रॅफिक. असे तीन प्रवाह एकाच ठिकाणी येतात. तर मला अधिकाऱ्यांना, एमएमआरडीए आणि वाहतूक विभागाला विचारायचंय… तुम्ही बसून ठरवत नाही का? की जर तीन प्रवाह एकाच ठिकाणी आले, तर तिकडे गोंधळच होणार आहे. कॉमन सेन्स असतो ना? म्हणजे काय फायदा झाला करोडो रुपये खर्च करुन?”.

आणखी वाचा – “पूर्णा आजीच्या नावे सदाफुली लावली”, ‘ठरलं तर मग’ला ९०० भाग पूर्ण होताच सेटवर कलाकार भावुक, मालिकेच्या टीमसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट

यानंतर त्याने व्हिडीओमध्ये पुढे ब्रिजच्या भिंतीवर थुकले असल्याचं दृश्य दाखवत “इकडे थुंकूनसुद्धा ठेवले आहे. बरं का? सामान्य माणूससुद्धा काही कमी नाही” असं म्हटलंय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने असं लिहिलं आहे की, “कॉमन सेन्सचा दुष्काळ. आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे. ४५ मिनिटं लागली हा नवीन ब्रिज पार करायला”, असं म्हणत सत्य परिस्थिती दाखवत संताप व्यक्त केला आहे.

Tags: mumbai trafficsocial newssumeet raghvan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Atharva Sudame reel

नेमकं चुकलं काय?, 'त्या' व्हिडीओमुळे अर्थव सुदामे चर्चेत की अडचणीत?, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा माफीनामा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.