गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेमकं चुकलं काय?, ‘त्या’ व्हिडीओमुळे अर्थव सुदामे चर्चेत की अडचणीत?, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा माफीनामा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 26, 2025 | 4:00 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
Atharva Sudame reel

नेमकं चुकलं काय?, 'त्या' व्हिडीओमुळे अर्थव सुदामे चर्चेत की अडचणीत?, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा माफीनामा

Atharva Sudame reel : पुण्याचा रील स्टार अर्थव सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अथर्वचा हिंदू-मुस्लिम ऐक्यावर भाष्य करणारा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याचा हा गणेशोत्सव व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली आणि त्याचक्षणी त्याने हा व्हिडीओ घाबरुन सोशल मीडिया अकाउंटवरुन डिलीट करण्यात आला. अर्थवचे हे व्हिडीओ डिलीट करणे त्याच्या चाहत्यांना आवडले नाही. अथर्वनं व्हिडिओ डिलिट केला असला तरी, या व्हिडिओमध्ये वादग्रस्त असं काहीच नव्हतं, त्यानं व्हिडिओ डिलिट नव्हता करायला हवा, असंही अनेकांनी म्हटलं.

अथर्वने शेअर केलेल्या रीलमध्ये तो एका मूर्तिकाराकडे गणपतीची मूर्ती खरेदी करायला जातो. त्यातील एक गणेशाची मूर्ती अथर्वला आवडते आणि तो बुक करतो. तेवढ्यात मूर्तिकाराचा मुलगा तिथे येतो आणि त्याला अब्बू अशी हाक मारतो. आणि त्याचवेळी अथर्व आणि तो मूर्तिकार एकमेकांकडे पाहतात. मूर्तिकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता. त्यावर अथर्व म्हणतो, ‘माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही. तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील.

आणखी वाचा – “पूर्णा आजीच्या नावे सदाफुली लावली”, ‘ठरलं तर मग’ला ९०० भाग पूर्ण होताच सेटवर कलाकार भावुक, मालिकेच्या टीमसाठी तेजस्विनीची भावनिक पोस्ट

अथर्वचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अर्थवला धमक्याही मिळाल्या. या वादात ब्राह्मण महासंघानंही उडी घेतली आणि त्याला सुनावलं. “सुदामेनं केवळ मनोरंजन करावं, अभ्यास नसलेल्या विषयाबद्दल बोलू नये”, “हिंदू-मुस्लिम ऐक्याबद्दल काहीतरी अक्कल शिकवतोय. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की तू करमणूक कर, लोकांना हसवं, त्याचं मनोरंजन कर आणि स्वत:चं पोट भर… अभ्यास नसलेल्या गोष्टीत न पडलेलं बरं”, अशा असंख्य प्रतिक्रिया सुदामेच्या त्या व्हिडीओवर आल्या.

आणखी वाचा – ‘KGF’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या ५५ व्या वर्षी निधन, ‘कांतारा’च्या शूटदरम्यान आलेला ब्रेन स्ट्रोक

यानंतर अर्थवने तातडीने तो व्हिडीओ डिलीट करत माफी मागितली. अथर्व म्हणाला, “माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला तो व्हिडीओ मी डिलीट केला आहे. बरेच लोक नाराज झाले, त्यांना ती व्हिडीओ आवडली नाही. तर, माझा अजिबात असा उद्देश नव्हता की, कोणाला दुखवायचं, कोणाच्या भावना दुखवायच्या. मी आतापर्यंत खूप व्हिडीओ असे केले आहेत जे आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत मराठी भाषेवर आहेत. माझ्या मनात अजिबातच असा कोणता उद्देश नव्हता की, कोणाला दुखवावं किंवा काय. पण तरीही, जर तुम्ही दुखावला असाल तर माफी मागतो”.

Tags: atharva sudamereel starsocial news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Vadapav Marathi film

गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी पाहायला मिळणार 'वडापाव'मधून, प्रसाद ओक यांच्या अभिनयाची या चित्रपटातून शतकपूर्ती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.