‘फ्रेशर्स’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता देशमुख. नुकताच ३१ जानेवारी रोजी तिचा वाढदिवस झाला आणि या वाढदिवसाचे सेलिब्रेशन अजूनही सुरुच आहे. वाढदिवसानिमित्त तिच्यावर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींकडून व तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. तिला अनेक भेटवस्तू दिल्या जात आहेत. अशातच नुकतंच तिच्या नाटकाच्या सेटवर प्रेक्षकांसमोर वाढदिवसाच खास सेलिब्रेशन करण्यात आले. अमृताचा नवरा व अभिनेता प्रसाद जवादेने तिच्यासाठी हे खास सेलिब्रेशन घडवून आणलं होतं. (Prasad Jawade celebrated Amruta Deshmukh birthday)
अभिनेत्री अमृता देशमुख सध्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकात काम करत आहे आणि याच नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान तिचं सेटवर प्रेक्षकांबरोबर केक कापत खास सेलिब्रेशन करण्यात आले. याबद्दल तिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमृताने असं म्हटलं आहे की, “वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमुळे तुम्हाला असे वाटते की, तुमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी तुम्ही किती प्रिय, मूल्यवान आहात. माझ्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, शाळेतील मित्र, सहकारी आणि यावर्षी माझ्याबरोबर आनंद साजरा करण्यासाठी प्रेक्षकांचा एक संच होता”.
आणखी वाचा – राखी सावंतच्या तुटलेल्या तिसऱ्या लग्नावर पूर्वाश्रमीच्या पतीने उडवली खिल्ली, म्हणाला, “पाकिस्तानची सून…”
यापुढे अमृताने प्रसादचा उल्लेख करत म्हटले की, “प्रसादचे आभार, कारण त्याने हे सर्व घडवून आणले”. तसंच पुढे ती म्हणाली की, “मला येणारे मॅसेज, इन्स्टाग्राम स्टोरी, टॅग माझ्यासाठी एक आठवण आहे की, मी तुमच्या हृदयात एक मोठी जागा व्यापली आहे”. अमृताने . तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे काही लहानपणीच्या वाढदिवसाचे फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसंच अनेकांनी कमेंट्समध्ये तिला पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
दरम्यान, अनेक मालिकांमधून दिसणारी अमृता देशमुख सध्या तिच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. सध्या या नाटकाचे जोरदार प्रयोग महाराष्ट्रभर सुरु आहेत. हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तर प्रसाद झी मराठीवरील ‘पारू’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.