रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला युट्यूबकडून मिळालं सिल्व्हर प्ले बटण, भावुक होत म्हणाला, “पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 2, 2025 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanket Korlekar received YouTube silver play button

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला युट्यूबकडून मिळालं सिल्व्हर प्ले बटण, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी ही मनोरंजन क्षेत्रात काम करण्याबरोबरच कंटेट क्रिएटरदेखील आहेत. मालिका, नाटक, चित्रपटांतून काम करण्याबरोबरच हे कलाकार सोशल मीडियावर विविध व्हिडीओ पोस्ट करत असतात. असाच एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजे संकेत कोर्लेकर. संकेत हा अभिनय क्षेत्रात तर सक्रीय आहेच पण तो सोशल मीडियावरदेखील कायम सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. काही मजेशीर, व्यंगात्मक किंवा समाजप्रबोधन करणारे अनेक व्हिडीओ तो शेअर करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय युट्यूबवरदेखील त्याचे अनेक सबस्क्राईबर्स आहेत. (Sanket Korlekar received YouTube silver play button)

युट्यूबवरील अनेक व्हिडीओमध्ये संकेतला त्याची बहीण उमा हिचीदेखील साथ मिळते. उमादेखील एक अभिनेत्री आहे. काही महिन्यांपूर्वी ती ‘स्टार प्रवाह’च्या ‘साधी माणसं’ मालिकेत पाहायला मिळाली होती. अशातच दोघांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठी कामगिरी केली आहे, ती म्हणजे दोघांना युट्यूबकडून सिल्व्हर प्ले बटण मिळालं आहे आणि यानिमित्त अभिनेत्याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने त्याच्या आई-वडिलांच्या कष्टाबद्दलही सांगितलं आहे. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक कलाकारांनी व चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे आणि त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sanket Avinash Korlekar (@korlekarmania)

आणखी वाचा – नाटकाच्या सेटवर अमृता देशमुखच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, नवऱ्याने केलेला खास प्लॅन, म्हणाली, “प्रेक्षकांबरोबर…”

या पोस्टमध्ये संकेतने असं म्हटलं आहे की, “घरात लहानपणापासून आई-पप्पांनी आम्हा दोघांना मोठं करण्यासाठी केलेला संघर्ष बघत मोठे झालो आहोत. पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि आईची कमी पगारात केलेली काटकसर स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे. आई-वडिलांनी आमच्यासाठी स्वतःचं पोट किती मारलं आहे हे आम्हाला दोघांनाच माहीत. आम्हाला दोघांना आई-वडिलांनी आमच्यावर केलेल्या संस्काराची जाणीव आहे. त्याची किंमत आहे. त्यामुळे आजपर्यंत आई-पप्पांची मान फक्त गर्वाने वर झाली कधीच झुकली नाही. आज त्यांचा मुला-मुलीने एकाच घरात दोन सिल्व्हर प्ले बटण आणले आहेत. आमची स्पर्धा स्वतःशी आहे. त्यामुळे हरायची भीती नाही”.

आणखी वाचा – दिवंगत रोहित बल यांच्या आठवणीत सोनम कपूरला कोसळलं रडू, ‘ओव्हरअ‍ॅक्टींग’ म्हणत नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, व्हिडीओ व्हायरल  

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “कोण किती पुढे जातंय? कोण किती मागे राहतंय? याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. आमचे टार्गेट ठरले आहे. आम्हाला इतकं मोठं व्हायचं की, आई-पप्पानी आमचा इतका पैसा बघून टेन्शन घेणेच सोडले पाहिजे. आम्ही क्लिअर आहोत. स्वतःचा रस्ता, स्वतःचे विश्व आणि प्रेक्षकांचे आशीर्वाद. बस्स. बाकी सगळं आमची मेहनत बघून घेईल. धन्यवाद”. दरम्यान, संकेतच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘अजूनही बरसात आहे’, ‘लेक माझी दुर्गा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘विठू माऊली’ आणि ‘अंतरपाटSanket Korlekar received YouTube silver play button, Marathi actor Sanket Korlekar, sanket korlekar,sanket korlekar interview,sanket korlekar serial,sanket korlekar reels,sanket korlekar biography,sanket korlekar sister,sanket korlekar family,videos of sanket korlekar,marathi actor,sony marathi,marathi serial,marathi vlog,sanket korlekar vithu mauli,uma korlekar,sanket korlekar fitness videos,colors Marathi, संकेत कोर्लेकरला मिळालं युट्यूब सिल्व्हर प्ले बटण, मराठी अभिनेता संकेत कोरलेकर, संकेत कोर्लेकर, संकेत कोर्लेकर मुलाखत, संकेत कोर्लेकर मालिका, संकेत कोर्लेकर रील, संकेत कोर्लेकर, संकेत कोर्लेकर बहिण, संकेत कोर्लेकर कुटुंब, संकेत कोर्लेकर व्हिडिओ, मराठी कलाकार, मराठी कलाकार, मराठी कलाकार, मराठी कलाकार, मराठी कलाकार, मराठी कलाकार ,मराठी मालिका,मराठी व्लॉग,संकेत कोर्लेकर विठू माऊली,उमा कोर्लेकर,संकेत कोर्लेकर फिटनेस व्हिडिओ,कलर्स मराठी’ मालिकेतून त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे.

Tags: Marathi actor Sanket Korlekarsanket korlekarSanket Korlekar received YouTube silver play button
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Dahavi-A Series daily updates

गावात भूत येणार अन् मुलांची तारांबळ...; 'दहावी-अ' नव्या वळणावर, पुढील भागात नक्की काय होणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.