शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मंगळसूत्र विकलं, पार्ट-टाइम नोकरीही केली अन्..; ‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्याला आठवले आईच्या कष्टाचे दिवस, म्हणाला “खायला पैसे नव्हते आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 26, 2024 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sanket Korlekar Emotional Post

मंगळसूत्र विकलं, पार्ट-टाइम नोकरीही केली अन्..; 'या' सुप्रसिद्ध अभिनेत्याला आठवले आईच्या कष्टाचे दिवस, म्हणाला "खायला पैसे नव्हते आणि..."

‘हम बने तुम बने’, ‘अजूनही बरसात आहे’ यांसारख्या मालिकांमधून अभिनेता संकेत कोर्लेकरने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. याशिवाय टकाटक या चित्रपटातून संकेत मोठ्या पडद्यावरही झळकला. सोशल मीडियावरही संकेत बऱ्यापैकी सक्रिय असतो. अनेक ट्रेंडिंग रील व्हिडीओ शेअर करत तो नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच संकेतने त्याच्या आईच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. संकेतची ही भावुक पोस्ट चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. (Sanket Korlekar Emotional Post)

संकेत त्याच्या आईबरोबर शेअर केलेल्या क्षणांचा एक व्हिडीओ बनवून तो शेअर केला आहे. या व्हिडीओसह कॅप्शन देत त्याने असं म्हटलं आहे की, “आई आज तुझा वाढदिवस. गेल्या १० वर्षात तुझ्यावरचं प्रेम १००० पट वाढलं आहे. त्याआधी तुला मी देव समजेन इतके प्रेम नव्हते कारण तू केलेल्या त्यागाची किंमत कळण्याइतपत माझी लायकी नव्हती. मला नोकरी करायची नव्हती छोट्याश्या गावातून येऊन अभिनेता बनायचं होतं. चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून स्ट्रगल करण्यासाठी माझा दुसरा छंद एडीटींग आणि रेकॉर्डिंग मधून पैसे कमवण्यासाठी तू मला न विचारता तुझं मंगळसूत्र विकलं आणि मला लॅपटॉप घेऊन दिलास”.

आणखी वाचा – खोटे चेक, खोटे गुगल पे अन्..; ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीची फसवणूक, संताप व्यक्त करत म्हणाली, “सोडणार नाही…”

View this post on Instagram

A post shared by Sanket Avinash Korlekar (@korlekarmania)

पुढे त्याने असंही म्हटलं आहे की, “मुंबईत राहायला, खायला पैसे नव्हते म्हणून भाड्याचा खोलीचे पैसे कमविण्यासाठी पप्पांबरोबर तू पण दोन हजार पगाराची पार्ट टाइम नोकरी केलीस पण कधीच म्हणाली नाहीस की, संकेत इतकी वर्ष झाली तुझं काहीच घडत नाही आहे. तू अभिनयाचा नाद सोड आणि परत गावला येऊन नोकरी कर. मी रडत खडत का होईना पण युनिवर्सबरोबर एकाच गोष्टीसाठी भांडत होतो की आत्ता माझ्यासाठी नाही माझ्या आईसाठी मला यशस्वी कर आणि आज आई वडिलांच्या आशीर्वादाने सगळं काही आहे”.

आणखी वाचा – दामिनीला मिळाली खोटेपणाची मोठी शिक्षा, तर अहिल्यादेवींचा पारू व आदित्यच्या नव्या ऍडशूटसाठी नकार, डिलही मोडायला सांगितली

आईसाठी केलेल्या भावुक पोस्टमध्ये त्याने असंही म्हटलं आहे की, “माझ्या कुटुंबाशिवाय माझं जगणंच व्यर्थ आहे. आई. तुझ्यावरचं हे प्रेम हा आदर मी मरेपर्यंत कायम असेल. माझ्या आईने माझ्यासाठी जे जे केलं ते मलाच माहित आहे. त्यामुळे मी आईसाठी काहीही करेन”.

Tags: marathi actorsanket korlekarSanket Korlekar Emotional Postsanket korlekar mother
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Pravin Tarde Wife Completed Study

प्रवीण तरडेंच्या बायकोने 'या' विषयात केलं शिक्षण पूर्ण, पोस्ट शेअर करत सांगितली आनंदाची बातमी, म्हणाली, "स्वतःला हिंदू म्हणताना…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.