शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझ्या लग्नात हुंडा मागू पण…”, लग्नापूर्वीच संकर्षण कऱ्हाडेला वडिलांनी सांगितलेली ‘ती’ गोष्ट, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 3, 2025 | 12:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan karhade viral post

“तुझ्या लग्नात हुंडा मागू पण...”, लग्नापूर्वीच संकर्षण कऱ्हाडेला वडिलांनी सांगितलेली ‘ती’ गोष्ट

प्रसिद्धी, पैसा, श्रीमंती आली तरी साधं-सरळ आयुष्य कसं जगावं हे संकर्षण कऱ्हाडेकडून खरंच शिकण्यासारखं आहे. संकर्षणने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. परभणीमधील गावातूाण केलं. परभणी सारख्या काभणीमधून शहरात येत त्याने जिद्दी, चिकाटीच्या जोरावर मेहनत, कष्ट केले. कलाक्षेत्रात स्वतःचं नाव कमावलं. आज मराठी नाटकांच्या इतिहासात तर संकर्षणचं नावही ठळक अक्षरात लिहिलं जातं. प्रसिद्धी, पैसा मिळवूनही त्याची संकर्षणची त्याच्या मातीशी जोडलेली नाळ अगदी घट्ट आहे. गाव, गावाकडची माती, आठवणी अजूनही तो विसरलेला नाही. खरं तर तो त्यामध्ये रमतो. याचाच एक किस्सा संकर्षणने आता पोस्ट शेअर करत सांगितला आहे. (Sankarshan karhade viral post)

संकर्षणने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टद्वारे शेअर केलेल्या फोटोमध्ये तो चुरमुरेंची भेल खाताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत संकर्षणने म्हटलं की, “आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू. हुंड्यात आयुष्यभर पूरतील इतके चूरमुरे, मुरमूरे आणि पोह्याचे पोते द्या असं माझे बाबा गंमतीने माझ्या लग्नाच्या आधी म्हणायचे. याचे कारण असं की, मुरमूर्या आणि पोह्यावर असलेलं नितांत प्रेम. एखाद्या व्यसनी माणसाला तलफ येते तशी मला दुपारी ४ वाजले की, मुरमुऱ्याची तलफ येते”.

आणखी वाचा – दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, सर्जरीसाठी रुग्णालयात जाताना नवऱ्याने हात जोडले अन्…; परिस्थिती अशी की…

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

“नाटकाच्या प्रयोगामुळे दुपारचं जेवण उशीरा झालं आणि तरीही ४ वाजता जर कुणी मुरमुऱ्याचा चिवडा किंवा गरम पोहे आणले तर मी नक्की खाईन. लहानपणी माझ्या शाळेच्या चड्डीचे दोन्ही खिसे आतून पिवळे असायचे. कारण मी सायकल चालवता चालवता खिशात भरून आणलेला मुरमुऱ्याचा चिवडा खायचो. खिशाच्या अगदी तळाशी चिवड्यातली मोहरी आणि मिठ असायचं. ते तर काय कमाल लागायचं. ही आवड आमच्या घरात अणुवंशीक आहे”.

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मधील मुक्ताचा अपघात, गाडी चालवताना झोप लागली अन्…; अभिनेत्रीचं मोठं नुकसान

“आमचे बाबा रात्री मॅच पाहाताना हमखास मुरमुरे खातात. आणि माझे साडेतीन वर्षांचे जुळेही मला “बाबा चिवले खाऊ?” असं म्हणतात आणि ताव मारतात. मुंबई-पुणे प्रवास करताना ४ वाजता मुरमुरे खावेसेच वाटले आणि मी ते खाल्ले. असो… तुमचा असा कोणता कौटुंबिक पदार्थ आहे का?”. या पोस्टद्वारे संकर्षणने अगदी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच चाहत्यांनीही विविध कमेंट करत संकर्षणचं कौतुक केलं. छान लिहिलं आहेस, आमच्या घरी पण चार वाजता हाच नाश्ता असतो, मस्त वर्णन केलंस अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

Tags: entertainment newsmarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Hollywood Actor Jonathan Joss death

ज्येष्ठ अभिनेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, याच वर्षी केलं होतं लग्न, हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.