मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा मनोरंजनाच्या तीनही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने आजवर अनेक मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावरही संकर्षण बर्यापैकी सक्रिय असते. नेहमीच तो सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. विशेषतः तो त्याला आलेले वैयक्तिक अनुभव शेअर करताना दिसतो. उत्तम अभिनेता असण्याबरोबरच संकर्षण उत्तम वडीलही आहे. (Sankarshan Karhade Childrens)
संकर्षण सोशल मीडियावर नेहमीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्यांच्या मुलांबरोबरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. कलाकार म्हटलं की बरेचदा शुटिंगनिमित्त त्याला बाहेर पडावं लागत वा कित्येक दिवस घराबाहेर राहावं लागतं. त्यामुळे बरेचदा त्यांची व मुलांची भेटही होत नाही. मुलांना ते नीट वेळ देऊ शकत नाहीत. अशातच संकर्षणही सध्या त्याच्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त घराबाहेर आहे. आणि घराबाहेर असताना तो त्याच्या दोन्ही बाळांना मिस करत असतो.
अशातच अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये संकर्षणने त्याच्या दोन्ही मुलांबरोबरचा खेळतानाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. “दौऱ्यावर असलो की मला माझ्या बाळांची फार फार आठवण येते. सकाळ झाली आणि भोवताली ते नसले की बाबाला बोअर होतं. आयुष्यातलं खरं खरं प्रेम हेच”, असं म्हणत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
संकर्षणला दोन जुळी मुलं आहेत. सर्वज्ञ , स्रग्वी अशी त्यांची नाव आहेत. संकर्षण त्याच्या दोन्ही मुलांचे अनेक व्हिडीओ व फोटोस शेअर करत असतो. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे यांना जितकं प्रेम मिळालं तितकंच प्रेम संकर्षणच्या समीर या भूमिकेला देखील मिळालं. मालिकेनंतर संकर्षण रंगभूमीवर रमला आहे. रंगभूमीवर देखील सध्या तो उत्तम काम करताना पाहायला मिळत आहे.’तू म्हणशील तस’,’नियम व अटी लागू’ या संकर्षणच्या नाटकांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतं आहे.