शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि…”, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “मला त्यांच्याबरोबर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 12, 2024 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade Post

"सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं आणि...", संकर्षण कऱ्हाडेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, "मला त्यांच्याबरोबर..."

मराठी नाटक, मालिका व चित्रपट आणि कविता या माध्यमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण हा त्याच्या अभिनयाव्यतिरिक्त अनेक कारणामुळे चर्चेत असतो. मालिकाविश्वातही संकर्षणने त्यांच्या अभिनयाने छाप पाडली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत संकर्षण महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला. मालिकेनंतर संकर्षणने रंगभूमीवर अभिनयाची जादू दाखवयाला सुरवात केली. सध्या संकर्षण ‘तू म्हणशील तसं’, ‘नियम व अटी लागू’ या नाटकांमध्ये व्यस्त आहे. तसेच ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा त्याचा कार्यक्रमही जोरदार सुरु आहे. (Sankarshan Karhade Post)

संकर्षण एक उत्तम लेखक, कवी व संवादकार असल्यामुळे त्याचे लिखाण, बोलणं हे नेहमीच त्याच्या चाहत्यांना आवडत असते. संकर्षण हा त्याच्या अभिनयामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या सोशल मीडियाद्वारेदेखील चर्चेत राहत असतो. सोशल मीडियावर संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने सोशल मीडियावर नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा – पारूमुळे आदित्य बरा झाला, अहिल्यादेवींनी हात जोडून आभारही मानले, वाईट वागणुकीचा होतोय पश्चाताप

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

संकर्षणने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तो काही पोलीस बांधवांसह दिसत आहे. पोलीस बांधवांबरोबरचा फोटो शेअर करत संकर्षणने असं म्हटलं आहे की, “सकाळी सकाळी पोलिसांनी पकडलं. आणि मला त्यांच्याबरोबर फोटो काढायची संधी मिळाली. आणि अखेर कैद झाला हा सेल्फी. जय हिंद”, असं कॅप्शन देत त्याने हा फोटो पोस्ट केला आहे. संकर्षणचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

आणखी वाचा – सायली प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आणणार का?, साक्षीलाही अर्जुन-चैतन्यवर संशय, मोठा ट्विस्ट

सर्वसामान्य प्रेक्षकांसह पोलीस मित्रही संकर्षणचे चाहते आहेत. संकर्षणच्या या पोस्टवर अनेकांनी गमतीशीर कमेंट करत पोस्टला पसंती दर्शविलेली पाहायला मिळत आहे. संकर्षण हा संयमी, संस्कारी व जबाबदारीने आणि विचार करुन बोलणारा अभिनेता आहे त्यामुळे चाहते नेहमीच त्याचे कौतुक करताना दिसतात.

Tags: entertainmentmarathi actorsankarshan karhadesankarshan karhade post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial update Adhipati and Akshara romancing in the kitchen video viral on social media.

अधिपती-अक्षरामध्ये जवळीक, स्वयंपाकघरातच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले, मात्र भुवनेश्वरीला आनंद पाहवेना

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.