महाराष्ट्रात सध्या अति उष्णतेची लाट आलेली पाहायला मिळाली. अनेकांना या उष्णेतला सामोरं जावं लागलं. तर काहीजण या उष्णतेपासून सुटका व्हावी म्हणून निसर्गाच्या सान्निध्यात फिरताना दिसले. आता या गरमीला त्रासून कंटाळलेल्या नागरिकांना थोडासा दिलासा मिळालेला पाहायला मिळत आहे. दोन दिवसापासून महाराष्ट्रात पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (Sankarshan Karhade Post)
अनेकांनी पहिल्या पावसात भिजून पहिल्या पावसाचा आनंद लुटलेला पाहायला मिळाला. अशातच आता एका मराठमोळ्या अभिनेत्याने पावसात भिजल्यानंतरचा आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद व्यक्त करणारा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण कऱ्हाडेने आजवर नाटक, मालिका, चित्रपट यांसारख्य तीनही माध्यमातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
आजवर संकर्षणने लेखन, दिग्दर्शन, अभिनय व कविता करत प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं आहे. अभिनयाशिवाय तो एक उत्तम लेखक, कवी असल्याचे आपण जाणतोच. सोशल मीडियावरही संकर्षण बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच पहिल्या पावसात भिजून आनंद व्यक्त करत त्याने एक फोटोही शेअर केला आहे. “भिजलो. मुंबईचा पाऊस”, असं कॅप्शन देत त्याने पहिल्या पावसानंतर खास पोस्ट शेअर केली आहे.
“आता घरी गेल्यावर आई ओरडेल ना”, “पहिल्या पावसाच्या ओल्याचिंब शुभेच्छा”, “काळजी घ्या सर आजारी पडाल”, “नाटकाचे प्रयोग बघताना आम्हीही मनोरंजनाच्या पावसात असच भिजून जातो”, अशा अनेक कमेंट चाहतेमंडळींनी केल्या आहेत. सध्या संकर्षण नाटकविश्वातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. संकर्षण हा सध्या त्याच्या ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रोयोगादरम्यान व्यस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. नियम व अटी लागू हे नाटक रंगभूमीवर विशेष गाजत आहे. या नाटकात संकर्षण व अमृता देशमुख ही जोडी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.