मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेता संग्राम साळवी व अभिनेत्री खुशबू तावडे. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान दोघांची ओळख झाली आणि त्यांचं प्रेम झालं. त्यानंतर २०१८मध्ये या दोघांनी त्यांचा लग्नसोहळा उरकला. संग्राम व खुशबू हे सिनेसृष्टीतील चर्चेत असलेलं कपल आहे. सध्या संग्रामची पत्नी खुशबू ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तर संग्राम काही दिवसांपूर्वी ऑफ एअर गेलेल्या ‘कन्यादान’ या मालिकेत झळकला होता. (Sangram Salvi On Khushboo Tawde)
संग्रामने नुकतीच कॉकटेल स्टुडिओ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना संग्रामने लग्नाआधीचा खुशबूच्या एका मालिकेतील सीनविषयी भाष्य केलं. यावेळी बोलताना संग्राम म्हणाला, “जेव्हा आमचं अफेअर नुकतंच सुरु झालं तेव्हाची ही गोष्ट आहे. तिची एक मालिका सुरु होती, त्याचा पहिला एपिसोड मला पाहायला मिळाला नाही. पण दुसऱ्या दिवशी आई म्हणाली की, खुशबूची मालिका आहे, तू काल बघितली नाहीस. तोपर्यंत आमच्या घरात माहिती होतं आणि घरातून सगळं ओके होतं. त्या मालिकेचा एपिसोड मी पाहायला बसलो. त्यामध्ये एक सीन आहे की, खुशबू येते आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला मिठी मारते. तेव्हा मी उठलो आणि निघून गेलो.
त्यानंतर खुशबूचा मला फोन आला आणि आम्ही संध्याकाळी भेटलो. तेव्हा तिने मला विचारलं की, तू पाहिलीस का मालिका. मी तिला म्हटलं हो मी पाहिलं, त्यावर ती म्हणाली की, मग तुला कसं वाटलं?, तू काय मला सांगितलं नाही. तेव्हा मी तिला सांगितलं, की काय आहे ना खुशबू ती जी मिठी मारलीस ना, तिथे मी उठून निघून गेलो. ते एकून तिला जरा दडपण आलं. ती मला म्हणाली अरे सॉरी तो सीनच तसा होता.
पुढे संग्रामने सांगितलं की, तेव्हा मी तिला म्हटलं की, बरोबर आहे. तो तुझा होणारा नवरा दाखवला आहे ना. तुझं लग्न ठरलंय त्याच्याबरोबर म्हणजे तुमचं नात खूप छान असणार. मग इतकी घाणेरडी मिठी कोण मारतं. म्हणजे असं वाकून वैगरे ऑकवर्ड पोजिशनमध्ये, नीट मिठी मारायची, तो होणारा नवरा आहे. त्यावर तिला जरा वेगळं वाटलं, तिने वेगळा विचार केला होता पण मी वेगळंच काहीतरी म्हटलं. पुढे मी तिला म्हटलं की, तू त्या पात्रात होती, मग ती मिठी छान मरायची ना, ते स्क्रिनवर छानच दिसलं पाहिजे. ते वाईट दिसल्यावर कुणी येऊन सांगणार नाही, ते तुला मीच येऊन सांगणार. अशावेळी थोडं अवघडल्यासारखं होतं, तो स्पर्श वैगरे, पण तू त्या पात्रात होतीस ना. तेव्हा मी तिला सांगितलं हे पुन्हा करु नकोस”.