कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आयुष्यभर धडपड करत असतो. त्याचबरोबरीने त्याची ही धडपड त्याच्या कुटुंबासाठीही सुरु असते. आपल्या कामाचं कौतुक होताना कुटुंब तिथे उपस्थित असावं असं सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारांनाही वाटतं. मात्र काही कलाकारांच्या नशीबी आई किंवा वडील यांची साथ अर्धवटच असते. आई-वडिलांनी आपल्या वाटल्याला आलेलं यश पाहावं, जगावं असं मनापासून वाटतं. मात्र काही गोष्टी हातात नसताना आहे ते सत्य स्वीकारावं लागतं. मात्र प्रत्येकक्षणी आई-वडिलांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं अभिनेते समीर चौघुले यांच्याबाबतीत घडलं आहे. ते आईच्या आठवणीमध्ये भावुक झाले आहेत. ‘गुलकंद’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला त्यांनी आईची आठवण काढली. बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणीही आलं. (Samir choughule talk about mother)
समीर चौघुले, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, ईशा डे यांचा ‘गुलकंद’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मोठ्या पद्यावर या चार कलाकारांची रंगलेली जुगलबंदी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. चित्रपटाचं पोस्टर, टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच ‘गुलकंद’ची जोरदार चर्चा रंगली होती. चित्रपटाकडून प्रेक्षकांना बऱ्याच अपेक्षा होत्या. प्रेक्षकांच्या या अपेक्षांचं ‘गुलकंद’ने सोनं केलं आहे. याच चित्रपटाच्या ट्रेलर लाँचदरम्यान ्र कांना बऱ्याच अपेक्षा होत्या समीर यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. आईविषयी खुलेपणाने ते बोलले.
आणखी वाचा – अनेक फ्रॅक्चर, जखमा, सहा तास शस्त्रक्रिया अन्…; रुग्णालयात अशा अवस्थेत आहे पवनदीप, पुन्हा ऑपरेशन होणार कारण…
स्टेजवर मजा-मस्ती सुरु असताना समीर यांनी मला काहीतरी बोलायचं आहे असं सांगितलं. दरम्यान त्यांनी आईविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, “या क्षणाला मला माझ्या आईची आठवण येते. आई खूप आधी गेली. तिला जाऊन वीस वर्ष झाली. ती या क्षणासाठी जगत होती असं म्हणायला हरकत नाही. पण अचानक एक दिवस ती हृदयविकाराच्या झटक्यामुळे गेली. हे कधी मी सांगितलेलं नाही. तर आज मला असं वाटतं की, आई असायला हवी होती”.
समीर आईविषयी बोलत असताना ईशा व सईने त्यांना सावरलं. त्यांचे डोळे पाणावले. आज लेकाला मिळालेलं यश पाहण्यासाठी आईच नाही याचं त्यांना आनंदाच्या क्षणी दुःख झालं. यावेळी ती सगळं बघत आहे असं म्हणत सईने त्यांची गोड समजूत घातली. त्यानंतर लगेचच समीर यांनी स्वतःला सावरत चित्रपटाबाबत बोलण्यास सुरुवात केली. सईविषयी बोलताना त्यांनी ड्रामा करत सगळ्यांना हसवलं. कधी रडू तर कधी हसू हिच कलाकाराची ताकद आहे हे त्याक्षणी अनुभवायला मिळालं.