गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : हळद लागली, नाचली अन् क्षणात नवरीचा जागीच मृत्यू, काळ आला अन्…; सजलेल्या मंडपात रडारड

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 6, 2025 | 6:17 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
bride die of heart attack

Video : हळद लागली, नाचली अन् क्षणात नवरीचा जागीच मृत्यू, काळ आला अन्...; सजलेल्या मंडपात रडारड

जन्माला आल्यानंतर मृत्यू अटळ हे थोरल्या मंडळींकडून आपण ऐकत आलो आहोत. मृत्यू कोणालाही चुकलेला नाही. मात्र अलिकडे अचानक मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपल्याला नेहमी भेटणारी व्यक्ती दुसऱ्यादिवशी डोळे उघडल्यानंतर समोर दिसेल की नाही? हा प्रश्न पडतो. क्षणात होत्याचं नव्हतं व्हायला सेकंदाचाही वेळ लागत नाही. मग अशावेळी नशिबापुढेही कोणी जाऊ शकत नाही. सोशल मीडियावरही असे कित्येक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आनंदाच्या क्षणी कुटुंबाबरोबर एकत्र राहणारी व्यक्ती हृदयविकाराचा झटका येऊन जागीच पडते आणि तिचा मृत्यू होतो, अशा कित्येक घटना समोर आल्या. आता असाच काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. नववधूने संसार थाटण्यापूर्वीच डोळे मिटले. हा भयंकर प्रकार काय? हे सविस्तर जाणून घेऊया.

उत्तरप्रदेशमध्ये घडलेली ही घटना आहे. नववधून हाताला मेहंदी लावून लग्नासाठी तयार झाली होती. उत्तरप्रदेशातील बदायूंमध्ये दीक्षा नावाची तरुणी राहत होती. तिचं लग्न ठरलं. विवाहसोहळ्यासाठी कुटुंबातील सगळी मंडळी जमली. सगळे जण आनंदात असताना भलतंच काही घडून गेलं. दीक्षा तिच्या हळदीच्या दिवशी बहिणी व नातेवाईकांसह नाचत होती. तिच्या गालाला हळदही लागली होती. मात्र दीक्षाच्या नशिबात काही भलतंच लिहिलेलं होतं. ज्याची पुसटशीही कल्प्ना कुटुंबिय व आई-वडिलांना नव्हती.

आणखी वाचा – Video : पाकिस्तानचा झेंडा पायऱ्यांवर लावला म्हणून विलेपार्लेमध्ये ‘त्या’ मुस्लिम महिलेचा दंगा, म्हणाली, “पाकिस्तानचा अपमान…”

"शादी की खुशियां मातम में बदली"

उत्तर प्रदेश के बदायूं जिले में शादी से एक दिन पहले युवती की हृदय गति रुकने से मौत हो गयी। परिवार के सदस्यों ने बताया कि रविवार देर रात तक हल्दी की रस्म के दौरान डांस कर रही दीक्षा (22) की अचानक तबीयत बिगड़ गयी, जिसके बाद वह शौचालय गयी, जहां हृदय… pic.twitter.com/lkIruvIamc

— MANOJ SHARMA LUCKNOW UP???????????????????????? (@ManojSh28986262) May 5, 2025

नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार, रविवारी (४ मे) रात्री उशीरापर्यंत दीक्षा तिच्या कुटुंबियांबरोबर हळदी कार्यक्रमाचा आनंद घेत होती. ती फक्त २२ वर्षांची होती. हळदी कार्यक्रमात डान्स करत असतानाच तिची अचानक तब्येत बिघडली. त्यानंतर ती शौचालयसाठी गेली. तिथेच तिला हृदयविकाराचा झटका आला. सोमवारी (५ मे) दीक्षाचं लग्न होणार होतं. पिनोनी गावातील ही घटना काळीज पिळवटून टाकणारी आहे. लग्नाचा मंडप सजलेला असताना वाईट काळ या कुटुंबावर धावून आला. क्षणात सगळीकडे दुःखाची चादर पसरली.

आणखी वाचा – मेहंदी रंगली गं! ‘बिग बॉस मराठी’ फेम अक्षय केळकरच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, होणारी पत्नी दिसते खूपच सुंदर

बदायूं पोलिसांनी सांगितलं की, “बराचवेळ दीक्षा शौचालयामधून आलीच नाही. म्हणूनच तिचे वडील दिनेश पाल सिंह बाथरुमजवळ गेले. त्यांनी बाथरुमचा दरवाजा ठोकवला. पण आतमधून दीक्षाने काहीच आवाज दिला नाही. कुटुंबातील काही मंडळींनी बाथरुमचा दरवाजा तोडला. समोर विचित्र चित्रच दिसलं. दीक्षा जमिनीवर पडलेली त्यांना दिसली. प्रथमदर्शनीच तिचा मृत्यू झाला असल्याचं दिसून आलं. मुरादाबाद जिल्ह्यातील शिवपुरी गावात राहणाऱ्या मुलाबरोबर दीक्षाचं लग्न होणार होतं”. या घटनेनंतर दीक्षाच्या कुटुंबियांनी तिचं शवविच्छेदन करण्यासही नकार दिला. मात्र हा काळा काळ कुटुंबियांना आयुष्यभराचं दुःख देऊन गेला.

Tags: trending newstrending video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Excessive Alcohol Risks

पाणी, सोडामध्ये नव्हे तर अशाच पाच बॉटल दारू पिताच २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू, मद्यपानाचं अतिसेवन किती घातक?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.