बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’मधून अक्षय हिंदळकरचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, दिग्गजांसह काम करण्याची संधी

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 6, 2025 | 3:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
psi arjun deshmane Marathi movie

अंकुश चौधरीच्या 'पी.एस.आय. अर्जुन'मधून अक्षय हिंदळकरचं मोठ्या पडद्यावर पदार्पण

मे महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. ‘झापूक झुपूक’, ‘थांबायचं नाय’, ‘गुलकंद’ सारखे मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल झाले आहेत. या चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांना विविध कथा अनुभवायला मिळत आहेत. अशातच आता आणखी एका चित्रपटाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर बऱ्याच चर्चा रंगल्या. अंकुशच्या भूमिकेची अधिक चर्चा पाहायला मिळाली. या चित्रपटाद्वारे छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध चेहरा प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अक्षया हिंदळकर अंकुशसह काम करताना दिसेल.

विविध मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अक्षया मोठ्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे. ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पी.एस.आय. अर्जुन’मध्ये ती अंकुशसह स्क्रिन शेअर करताना दिसेल.  ॲक्शन आणि सस्पेन्सने भरलेल्या या चित्रपटात अंकुश एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर अक्षया यात कोणत्या भूमिकेत दिसणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण अक्षया एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार हे नक्की आहे.

आणखी वाचा – ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील ‘मन जाई’ गाणं प्रदर्शित, कोकणातील सौंदर्याने वेधलं लक्ष, चित्रपटाची उत्सुकता वाढली

View this post on Instagram

A post shared by Akshhaya Hindallkar ???????? (@me_mrugasi)

भूमिकेबद्दल अक्षया म्हणाली, ‘’पहिल्याच चित्रपटात दिग्गजांसह काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. आजवर कधीही न साकारलेली भूमिका मी या चित्रपटात साकारणार आहे. चित्रपटाची कथा ऐकून मी यासाठी लगेचच होकार दिला. चित्रपटात दिग्गज कलाकार असल्यामुळे सुरुवातील थोडं दडपण होतं. सहकलाकारांनी सांभाळून घेतल्याने आपसूकच काम चांगलं झालं’’.

आणखी वाचा – “नवऱ्याचे सगळ्या मैत्रिणींसह शरीर संबंध आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे वैवाहिक आयुष्याबाबत धक्कादायक वक्तव्य, सासरच्या मंडळींनी तर…

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत. विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी ‘पी. एस. आय. अर्जुन’ प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Tags: marathi actormarathi actressmarathi movie
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
pakistani flag controversy

Video : पाकिस्तानचा झेंडा पायऱ्यांवर लावला म्हणून विलेपार्लेमध्ये ‘त्या’ मुस्लिम महिलेचा दंगा, म्हणाली, “पाकिस्तानचा अपमान...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.