Sagar Karande Post : जवळपास १० वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळेंबरोबर कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे अशी तगडी स्टारकास्ट होती. या विनोदवीरांनी महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या कार्यक्रमातील एक पात्र नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिलं ते म्हणजे सागर कारंडे. सागरने साकारलेल्या स्त्री पात्रामुळे तो नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. सागरने आजवर त्याच्या या स्त्री पात्राने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र जेव्हा सागरने या कार्यक्रमातून ब्रेक घेण्याचे ठरवले त्यावेळी प्रेक्षकांनाही धक्का बसला.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेलं एक नाव म्हणजे सागर कारंडे. या कार्यक्रमात सागरने कधी स्त्री पात्र साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं, तर कधी पोस्टमन काका बनून रडवलं. या शोनंतर सागर अधूनमधून पाहुणा कलाकार म्हणून येत प्रेक्षकांची मन जिंकली. सोशल मीडियावरही सागर बऱ्यापैकी सक्रिय असतो. याशिवाय सागर कारंडे या नावाने त्याचं स्वतःच युट्युब चॅनेलही आहे. यावर तो नेहमीच त्याचे राईडचे व्हिडीओ शेअर करत असतो.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ला अधिकाधिक पुरस्कार न मिळण्यावरुन प्रेक्षकांची नाराजी, मालिका अव्वल स्थानावर तरीही…
अशातच सागरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. आधीच सागर हवा तसा चाहत्यांच्या भेटीस येत नसल्याने प्रेक्षक नाराज होते यांत सागरच्या नव्या पोस्टने तर त्यांना खूप मोठा धक्का दिला आहे. “यापुढे स्त्री पात्र करणार नाही”, अशी पोस्ट सागरने शेअर केली आणि साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. सागरने शेअर केलेली ही पोस्ट नेमकी कशासाठी हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, आता यापुढे सागर स्त्री पात्रातून दिसणार नाही हे त्याने स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा – वैष्णोदेवी परिसरात ओरीची दारू पिऊन पार्टी, हॉटेलमध्ये मिळाले पुरावे, पोलिसांत तक्रार दाखल कारण…
सागरच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला एकप्रकारे पाठिंबा दिला आहे. “सागर कारंडे म्हणजे ज्युनिअर ते परिपक्व पोस्टमन काका आणि अशा बऱ्याच भूमिकांचा प्रवास आम्ही पहिला आहे. तुमचं काम निवडून निरखून घेणं हा तुमचा हक्कच आहे. तुम्हाला सर्व प्रकारच्या भूमिकेत पाहण्यास आम्ही सदैव उत्सुक आहोत. या माणसाने आम्हाला हसवलं हे वाक्य तुम्हाला प्रत्येक मराठी माणूस नक्कीच म्हणू शकतो. धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”, “कोणतंही पात्र करा भारीचं असतं”, असं म्हणत पाठिंबा दिला आहे, तर काहींनी “स्वारगेटे बाई तुम्ही सगळं बंद करता पण हे बंद करु नका, मिस यु”, “मग शो पाहण्यात मज्जा नाही”, “त्यामुळेच तुम्हाला जास्त लोकं ओळखतात”, अशा असंख्य कमेंट करत सागरच्या स्त्री पात्राला मिस करणार असल्याचं म्हटलं आहे.