रितेश व जेनेलिया नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत असतात. काही ना काही हटके पोस्ट करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. महाराष्ट्राचे लाडके दादा,वहिनी म्हणून त्यांनी आपलं एक वेगळं स्थान प्रेक्षकांमध्ये निर्माण केलं आहे. त्यांचा हा रिअल लाईफ प्रवास त्यांनी अनेकदा चाहत्यांसह शेअर केला आहे. सोशल मीडियावरही ही जोडी नेहेमीच सक्रिय असते. काही ना काही हटके शेअर करून ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Riteish Deshmukh And Genelia Deshmukh)
याशिवाय रितेश व जेनेलिया यांच्या मुलांची ही सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु असते. त्यांचे संस्कार, ते जपत असलेली संस्कृती या गोष्टींचं नेटकरी कायमच कौतुक करतात. प्रत्येक सण, उत्सव साजरे करणं असुदे वा मोठ्यांना आदर देणं असूदे त्यांच्या या वागणुकीबद्दल रितेश,जेनेलिया यांचं पालक म्हणून नेहमीच कौतुक होताना पाहायला मिळत. त्यांच्या बऱ्याच ऍक्टिव्हिटी देखील रितेश जेनेलिया कौतुकाने शेअर करतात.
मुलांच्या संगोपनासाठी कित्येक वर्षे जेनेलियाने सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. जेनेलियाने नुकतीच एक स्टोरी पोस्ट केली आहे, यांत रितेश देशमुख तीन दिवसाचं वेळापत्रक लिहिताना दिसत आहेत. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये “आई तीन दिवसांसाठी बाहेर जाणार आहे, आणि बाबांनी घर सांभाळायचं ठरवलं आहे, रितेश आय लव्ह यु” असं कॅप्शन देता तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रितेश-जेनेलिया नेहमीच एकमेकांना मदत करत असतात. अशातच जेनेलिया तीन दिवसांसाठी बाहेर जाणार असून मुलांना सांभाळण्याची जबाबदारी रितेशने घेतली असल्याचं समोर आलं आहे. यासाठी जेनेलियाने मुलांचं व घराचं तीन दिवसांचं वेळापत्रक तयार करून दिलं आहे. याचा एक गोड व्हिडीओ तिने शेअर केला आहे.

आणखी वाचा – अखेर निकाल लागला! सचिन तेंडुलकरच्या लेकीने सोशल मीडियावर शेअर केली गुडन्यूज
रितेश व जेनेलिया नेहमीच मुलांबरोबर वेळ घालवताना दिसतात. जेनेलिया कामानिमित्त बाहेर जात असताना रितेश मुलांकडे विशेष लक्ष देताना दिसतो. दोघांचं त्यांच्या मुलांवर भरपूर प्रेम आहे, आणि हे प्रेम नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमधून पाहायला मिळतं.