गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“असे फालतू जोक…” ‘त्या’ व्यक्तीच्या पार्श्वभागाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला चाहतीने सुनावलं

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 5, 2023 | 3:55 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actor pushkar shrotri share funny video

“असे फालतू जोक...” ‘त्या’ व्यक्तीच्या पार्श्वभागाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला चाहतीने सुनावलं

मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. पुष्करच्या अभिनयाचे तसेच त्याच्या विनोदीबुद्धीचे हजारो चाहते आहेत. आजवर त्याने विविध विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस केलं. त्याने साकारलेल्या विनोदी भूमिकांनी सिनेरसिकांना खळखळून हसवलं. नेहमीच व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढत तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संपर्क साधतो. विविध व्हिडीओ व फोटोही तो शेअर करताना दिसतो. आताही त्याने असाच एक विनोदी व्हायरल व्हिडीओ फेसबुक अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओवरुन पुष्करला एका चाहतीने सुनावलं.

पुष्करने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती वाद्य वाजवताना दिसत आहे. मात्र वाद्य वाजवत असलेल्या व्यक्तीच्या पार्श्वभागावर कॅमेरा केंद्रित करण्यात आला आहे. या व्हिडीओ खरं तर विनोदाच्या दृष्टीने बनवण्यात आला आहे. पुष्करनेही त्याच दृष्टीने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “काही कामं समोरुन खूप सोपी वाटतात. पण मागे पाहिल्यावर कळतं, खरंच खूप कठीण असतात.”

आणखी वाचा – जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही जिनिलीया देशमुख, म्हणालेली, “तेल न वापरता मी…”

त्याच्या या पोस्टवर एका चाहतीने कमेंटद्वारे राग व्यक्त केला. ती म्हणाली, “पुष्कर जी आपल्या या पोस्टवर कमेंट केलेल्या एकाने तरी, गेला बाजार तुम्ही तरी हे वाद्य हातात घेऊन त्यात फुंक मारून ‘सा’ वाजवून दाखवा. मग असे फालतू जोक करा. कसे का असेना ते कलाकार आहेत. तुमच्यासारखे आणि कलाकारांना काय काय करावं लागतं हे तुम्हालाच अधिक माहित ना? पोस्ट वाचून मला वाटलं चला गंभीर विषय आहे. पण कमेंट वाचल्यावर समजलं, तुम्ही पण टाइमपास करत आहात. बाकी आपण मोठे आणि समंजस कलाकार आहात”. यावर पुष्करनेही कमेंट केली.

आणखी वाचा – Nitin Desai Wife Emotional: अश्रूंच्या धारा, अस्वस्थ चेहरा आणि…; नितीन देसाईंच्या पत्नीला स्वतःला सावरणंही झालं कठीण

पुष्कर म्हणाला, नमस्कार. लहानपणी आम्ही कुठल्याही जोकची सुरवात ‘एक सरदारजी असतो’ या वाक्याने करायचो. (आता तसं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ते जातीवाचक होईल.) त्यावेळी जोक सांगून संपला की सगळे हसायचे. पण आमच्या एका मित्राची आई “बिच्चारा सरदारजी…” असं म्हणायची. आम्ही त्यावर चक्रावून जायचो. धम्माल विनोदाला असं कसं प्रतिक्रिया देतात या? मग कळलं की विनोदातही कारुण्य शोधणं ही कला असते आणि ती फार कमी लोकांना जमते”.

आणखी वाचा – Nitin Desai Funeral : …अन् वडिलांना पाहून लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर

“एखाद्या वेळी तुमच्या समोर तुमच्या ओळखीची व्यक्ती अचानक जोरात शिंकली किंवा हलकी धडपडली तर तुम्हाला कधी बारीकसं हसू नाही आलं? कमाल आहे! तेव्हा या पोस्टमध्ये कोणाचा, कोणाच्या कलेचा, कुठल्या वाद्याचा, कुठल्या अवयवाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. तसं वर स्पष्ट म्हटलंही आहे. हा निव्वळ विनोद होता. तो बहुतेकांनी तसाच घेतला आहे, आपण सुद्धा घ्यावा! धन्यवाद”. पुष्करने अगदी स्पष्टपणे त्याची बाजू मांडली आहे.  

Tags: entertainmentits majjamarathi actressmarathi serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Sharad Ponkshe apologized to Sonalee Kulkarni

…अन् सोनाली कुलकर्णीची शरद पोंक्षेंनी मागितली होती माफी, भर कार्यक्रमात सुनावल्यानंतर फोन करुन म्हणाले, "तू दिसलीस आणि…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.