मराठी चित्रपटसृष्टीत अशी काही नावं आहेत, जी स्पष्ट व रोखठोक बोलण्यासाठी ओळखली जातात. अभिनेते शरद पोंक्षे हे त्यातीलच एक नाव. शरद पोंक्षे यांनी नाटक, मालिका व चित्रपट या तिन्ही माध्यमातून त्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकलेली आहे. अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे शरद पोंक्षे यांना मात्र सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. शिवाय ते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही नेहमीच चर्चेत असतात. अशातच शरद पोंक्षे यांनी एका मुलाखतीत मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची माफी मागितली होती. (Sharad Ponkshe apologized to Sonalee Kulkarni)
अभिनेते शरद पोंक्षे नुकतंच अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या ‘गप्पा मस्ती पॉडकास्ट’मध्ये सहभागी झाले होते. त्या पॉडकास्टचा दुसरा भाग समोर आला असून ज्यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची माफी मागितली होती. शरद पोंक्षे यात म्हणाले, “मी २५ वर्ष धावल्यानंतर जेव्हा मला १ वर्ष घरात बसायला मिळालं, तेव्हा मला त्या ५२ वर्षांच्या आयुष्यात मी कोणाला दुखावलं, त्यांची माफी मागण्यासाठी वेळ मिळाला. त्यावेळेस मी शांतपणे मालिका, सिनेमे, नाटकं, भांडणं या सगळ्यांचा विचार करायचो. मग अशी काही चार-पाच नावं काढली, ज्यांच्याबरोबर मी भांडलो होतो, त्यांना फोन लावले.”
काय म्हणाले शरद पोंक्षे (Sharad Ponkshe apologized to Sonalee Kulkarni)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीबद्दल बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, “‘मी नथुराम गोडसे बोलतोय’चे ७०० प्रयोग झाल्यानंतर मला संस्कृती कलादर्पणने लक्षवेधी अभिनेत्याचा पुरस्कार दिला होता. ७०० प्रयोग लागले लक्ष वेधून घ्यायला, तर मग सर्वोकृष्ट अभिनेत्यासाठी मला अजून ७०० प्रयोग करावे लागणार, असं भाषण तेव्हा मी केलं होतं. पुरस्कार घेतलं आणि दोन शब्द बोललो, खूप काही बोललो मी. तेव्हा म्हटलं की आजचे पुरस्कार सोहळे होतात, ते इतके रटाळ आणि कंटाळवाणे असतात. ते दोघे कोणीतरी येतात आणि तिकडे काहीतरी दिलेलं सगळं वाचतात. हे बोलत असताना मला खाली सोनाली कुलकर्णी दिसली. मी म्हटलं, ह्या बिचाऱ्या पोरी तीस वर्षांपूर्वीच्या त्याच गाण्यावरती तसंच नाचतात. त्यांना माझी विनंती आहे, हा पॅटर्न बदला.”
हे देखील वाचा – “दिग्दर्शक,निर्मात्यांसोबत खूप भांडणं झाली कारण…” शरद पोंक्षेनी केला खुलासा
“नंतर याला दोन-तीन महिने गेले. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की, मी त्या सोनालीला उगीच बोललो. माझा रोख खरंतर तिला दुखावण्याचा नव्हता. पण मला म्हणायचं होतं की, फक्त पॅटर्न बदला. कारण आज आपण इतकी वर्ष त्या पुरस्कार सोहळ्याला जातो, पण तेच आहे. ते जे कोणी अद्वितीय अशी निवेदन करतात की, ते इतके कंटाळवाणं, रटाळ असतं. मेकअप रूममधले किस्से सांगतात, ज्याचा प्रेक्षकांशी काही संबंध नसतो. मग आपले सगळे कलाकार ओरडत असतात. म्हणून त्या सोहळ्यात मला बोलायची संधी मिळाली, तेव्हा सगळं बोललो. त्यामुळे खूप लोक नाराज झाली.”
हे देखील वाचा – पायलट झाली शरद पोंक्षेंची लेक, फोटो शेअर करत म्हणाले, “माझं आजारपण, खडतर परिस्थिती अन्…”
“मग मी त्यानंतर सोनालीला फोन लावला. तेव्हा तिला म्हटलं, कधीपासून मनात होतं. मला माफ कर. तुला अजिबात दुखवायचं नव्हतं. फक्त मला त्या सोहळ्याच्या पॅटर्नचा कंटाळा आलाय आणि तो बदला, असं म्हणायचं होतं. मला जुनी नाट्यदर्पण रजनी आठवली. जी संध्याकाळी ८ वाजता सुरू होऊन पहाटे ५ वाजता संपायची. इथल्या पुरस्कार सोहळ्यात ते कानाला माईक वगैरे लावून माणसं आहेत, तरीही चुकीचं व्यवस्थापन असतं. तेव्हा असं नसतानाही २५ वर्ष रजनी पुरस्काराचं परिपूर्ण व्यवस्थापन केलं गेलं होतं. त्यावेळेस हे सगळं मला बोलायचं होतं, पण त्यात तू दिसलीस. त्यामुळे मला तुझी क्षमा मागण्यासाठीच हा फोन केला.” असे ते म्हणाले.
हे देखील वाचा – “असे फालतू जोक…” ‘त्या’ व्यक्तीच्या पार्श्वभागाचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला चाहतीने सुनावलं
या फोनवर सोनाली म्हणाली, “अरे दादा. तू प्लीज असं काही बोलू नकोस.” तेव्हा तिच्या मनात काही राहायला नको म्हणून त्या वेळेस मी तिला फोन करून बोलून मोकळा झाल्याचे शरद पोंक्षे म्हणाले. (Sharad Ponkshe apologized to Sonalee Kulkarni)