सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “त्या फिक्कीचा माज उतरवा”, मराठी अभिनेत्याला निक्कीची वागणूक पटेना, म्हणाला, “वर्षा मॅमचा एवढा अपमान…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2024 | 2:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bigg Boss Marathi season 5 pushkar jog angry

'बिग बॉस मराठी'च्या घरात पुष्कर जोगला या कारणासाठी पुन्हा यायचंय

Bigg Boss Marathi season 5 : सिनेमाविश्वात असे बरेच कलाकार आहेत जे त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ही कलाकर मंडळी न पटणाऱ्या मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केल्याने व पोस्ट शेअर केल्याने चर्चेत येतात. तर काही कलाकार मंडळी अशी आहेत जे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतचे अनेक अपडेटही सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतात. यापैकीच एक अभिनेता म्हणजे पुष्कर जोग. पुष्करने बरेचदा न पटणाऱ्या व विविध अंगी विषयावर भाष्य करत त्याचं मत मांडलं आहे. मात्र पुष्कर सध्या चर्चेत असलेल्या ‘बिग बॉस मराठी’ या रिऍलिटी शोमुळे चर्चेत आला आहे.

सध्या ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन धुमाकूळ घालताना दिसत आहे. अगदी कमी वेळात या सीझनने प्रेक्षकांची मन जिंकली. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस’ मराठीच्या घरात स्पर्धकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहेत. यंदाच्या पर्वात ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर ही आहेत. या पर्वात अनेक स्पर्धकांकडून वर्षा यांचा अपमान झालेला पाहायला मिळाला. मात्र संबंध महाराष्ट्राने पेटून उठताच भाऊच्या धक्क्यावर त्यांची माफीही मागितली गेली.

आणखी वाचा – विराट कोहलीच स्वतःच्या मुलांसाठी बनवतो जेवण, लंडनमध्येच थाटला संसार, पत्नीला त्रास नको म्हणून…

सध्या घरात निक्कीची अरेरावी पाहायला मिळत आहे. जेवण आणि घरातल्या कामांवरुन झालेल्या भांडणांमध्ये निक्कीने वर्षा उसगांवकरांबद्दल पुन्हा एकदा चुकीचे शब्द वापरल्याचं पाहायला मिळालं. निक्कीशी कॅप्टन म्हणून वर्षा बोलायला गेल्या तेव्हा, “तुमच्यासमोर मी आत बाथरुममध्ये जाऊन दाखवेन. मला अडवणारा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही मला हुकूम देऊ नका. कॅप्टन आहात, तर कॅप्टनच राहा. इथे बादशाह नका होऊ. माझा बाप बनू नका. समजलं ना? कॅप्टनच्या हैसियतमध्ये राहा”, असं म्हटलं.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अंकिता व अभिजीतची मोठी प्लॅनिंग, वर्षा उसगांवकर दुखापतीचे नाटक करणार, एवढा गेम प्लॅन कशासाठी?

निक्कीकडून वर्षा यांचा झालेला अपमान ‘बिग बॉस’ फेम अभिनेता पुष्कर जोगला खटकला. यापूर्वीही वर्षा यांचा अपमान होताच पुष्करने स्पर्धकांना खडेबोल लगावले. आता पुन्हा एकदा निक्कीला धडा शिकवायला पुष्करने केलेली एक पोस्ट लक्ष वेधून घेत आहे. “मला एकदा घरी पाठवा. वर्षा उसगांवकर मॅमचा एवढा अपमान मी सहन करु शकत नाही. अरे मर्दांनो उठा. त्या फिक्कीचा माज उतरवा #कहर”, असं कॅप्शन देत त्याने राग व्यक्त केला आहे.

Tags: bigg boss marathibigg boss marathi season 5pushkar jog angry post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates netizens expressed their anger on Nikki Tamboli behavoiur in the house

Bigg Boss Marathi : "निक्की 'बिग बॉस'ची लाडकी आहे का?", निक्कीची आरेरावी पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले, "तिला शिक्षा द्या नाहीतर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.