‘टाइमपास’, ‘बालक-पालक’, ‘ताजा खबर’, ‘दृश्यम’ फेम प्रेक्षकांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब लवकरचं बोहोल्यावर चढणार आहे. अभिनेत्याने गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधत त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. यानंतर अभिनेत्याने थेट त्याच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. प्रथमेश व त्याची होणारी पत्नी क्षितिजा घोसाळकर यांनी त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर केले आहे. (Prathamesh Parab Wife)
‘आमचं ठरलंय’ हा असं कॅप्शन देत क्षितिजा व प्रथमेश यांनी त्यांच्या केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. प्रथमेश परब लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून क्षितीजा घोसाळकरसह रिलेशनशिपमध्ये होता. आता ही जोडी लवकरच लग्न करणार असून अलीकडेच त्यांचे केळवण पार पडले. त्यामुळे या जोडीच्या लग्नसोहळ्याची तारीख दूर नाही एवढं मात्र नक्की.
प्रथमेश परबची होणारी बायको क्षितिजा घोसाळकरबद्दल फार कमी जणांना ठाऊक असेल. कारण अभिनयक्षेत्राशी तिचा तितकासा संबंध नाही. क्षितिजाचं नेमकं शिक्षण किती, व साध्य ती कुठे कार्यरत आहे याबाबत साऱ्यांना जाणून घेणे औत्स्युक्याचे आहे. प्रथमेश परबच्या होणाऱ्या पत्नीने म्हणजेच क्षितिजाने Biotechnology मध्ये Masters, BARC ( Bhaba Atomic Research Center) मध्ये lung Cancer व Breast Cancer वरील project, 2 International research papers चं publication, professor of biotechnology चं शिक्षण घेतलं आहे.
क्षितिजा सामाजिक कार्य करणाऱ्या एनजीओमध्ये सध्या काम करत आहे. काहीतरी सामाजिक कार्य केलं पाहिजे ही तळमळ क्षितिजा एनजीओमार्फत पूर्ण करताना दिसत आहे. याशिवाय एक फॅशन मॉडेल म्हणूनही तिने काम केले आहे. सामाजिक कार्यात हातभार लावल्याप्रती व प्रवास योग्य दिशेने सुरु आहे याची पावती पुरस्कार रुपात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून क्षितिजाला मिळाली. जागतिक महिला दिनानिमित्त अभिनेत्याच्या होणाऱ्या पत्नीने याची पोस्ट शेअर केली होती.