Prathamesh Parab Special Post : मराठी सिनेविश्वातील नेहमीच चर्चेत असणार जोडपं म्हणजे अभिनेता प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितिजा घोसाळकर. नेहमीच प्रथमेश व क्षितिजा सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला प्रथमेश परबने क्षितिजा घोसाळकरशी लग्नगाठ बांधली. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मोठ्या थाटामाटात आणि पारंपरिक अंदाजात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. आता लग्नाचा पहिला वाढदिवस दोघेही थायलंडमध्ये साजरा करताना दिसत आहेत. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त क्षितिजा व प्रथमेश हे परदेशवारी करत आहेत. लग्नानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्रीपला ही जोडी गेली आहे. दोघांचे थायलंडमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रथमेश परबने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या खास फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पहिल्या फोटोमध्ये प्रथमेश क्षितिजाला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये क्षितिजा वरमाला घालून प्रथमेशच्या पाया पडताना दिसतेय. त्यानंतर प्रथमेशदेखील तिच्या पाया पडतो. लग्नातील खास क्षण अभिनेत्याने शेअर करत खास कॅप्शनही या पोस्टला दिले आहे. “२४.०२.२०२४. आतुरतेने वाट पाहिलेला आणि कधीही न विसरता येणारा दिवस”, असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.
प्रथमेश परबच्या या खास पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया देत दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”, “बायको विसरु पण देणार नाही, चिंता नसावी” अशा अनेक कमेंट आणि हार्ट ईमोजी चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत. सध्या दोघेही थायलंड येथे त्यांच्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहेत.
आणखी वाचा – रेकॉर्डब्रेक कमाई, विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट, ३०० कोटींचा आकडा पार
लग्नानंतर प्रथमेश व क्षितिजा बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. दोघेही कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून एकमेकांना वेळ देताना दिसतात. बरेचदा ते एकत्र फिरतानाही दिसतात. क्षितिजाही नवऱ्याचं कौतुक करत अनेकदा पोस्ट शेअर करताना दिसते. प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये सध्या ती कार्यरत आहे.