शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…”, पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 20, 2023 | 10:34 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actor piyush ranade take ukhana for her wife actress suruchi adarkar see the full video

"नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…", पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ

गेल्या काही दिवसांत हिंदीसह मराठीतील अनेक कलाकार लग्नाच्या बंधनात अडकले. प्रसाद जवादे व अमृता देशमुख या जोडीच्या लग्नाच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच अभिनेत्री सुरुची अडारकार व अभिनेता पियुष रानडे यांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. सोशल मीडियावरील त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. सुरुची-पियुष यांच्या मेहंदी व हळदी समारंभाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनच्या लूकमधील फोटोंनासुद्धा चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. दोघांच्या लग्नाच्या फोटोंनी चाहत्यांसह अनेकांचे लक्ष वेधून घेतलं. (Piyush Ranade & Suruchi Adarkar)

सुरुची-पियुष यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे “आनंदाचा दिवस” असं म्हणत लग्नाचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले होते. सुरुची-पियुष यांच्या नात्याविषयी कुणालीही कल्पना नव्हती. सुरुची-पियुष यांच्या लग्नाच्या फोटोंवर अनेकांनी कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला. तर अनेकांनी त्यांना कमेंट्स करत संमिश्र प्रतिक्रियाडी व्यक्त केल्या. सुरुची-पियुष यांचे लग्न हे अगदी विधीवत झाले असले तरी त्यांच्या लग्नातील उखाणा काय होता? हे जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा होती, हीच इच्छा ‘इट्स मज्जा’ने पूर्ण केली आहे. नुकतीच ‘इट्स मज्जा’ने सुरुची-पियुष यांची केळवण स्पेशल अशी मुलाखत घेतली.

आणखी वाचा – “मी आता थोडा…”, हृदयविकाराच्या झटक्यानंतर पाच दिवसांनी स्वतः श्रेयस तळपदेने दिली हेल्थ अपडेट, म्हणाला, “तुमच्या प्रार्थनांमुळे….”

सुरुची-पियुष यांच्या केळवण स्पेशल मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लव्हस्टोरीविषयी व त्यांच्या नात्याविषयी खुलेपणाने संवाद साधला. दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल तसेच त्यांच्या नात्याबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. सुरुची-पियुष यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली?, त्यांच्या नात्यात नेमका कुणी पुढाकार घेतला? याबद्दल दोघांनीही भाष्य केले आहे. यावेळी पियुषने आपल्या लाडक्या पत्नीसाठी खास उखाणा घेतला.

आणखी वाचा – “आधी लग्नाबाबत घरी सांगितलं अन्…”, सुरुची अडारकर व पियुष रानडेने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला, “पाच वर्षांपासून…”

सुरुचीला झोप ही अत्यंत प्रिय असून याच झोपेशी निगडीत त्याने त्याच्या गंमतीशीर अंदाजात सुरुचीचे नाव घेत हटके उखाणा घेतला. यावेळी पियुषने “नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप, नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप, सुरुचीला दुसरं काहीही नको, फक्त हवी असते दुपारची छान झोप” असं म्हणत हटके उखाणा घेतला. लग्नातही पियुषने हाच उखाणा घेतला असल्याचं सांगितलं. दरम्यान सुरुची-पियुष आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाली असून दोघे एकमेकांबरोबर आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Tags: Piyush RanadeSuruchi AdarkarSuruchi Adarkar Piyush Ranade Latest Marathi NewsSuruchi Adarkar Piyush Ranade Marriage marathi newsSuruchi Adarkar Piyush Ranade PhotosSuruchi Adarkar Piyush Ranade wedding marathi newsSuruchi Adarkar Wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate Wedding

हळद लागली! प्रथमेश लघाटेच्या हळदी सोहळ्याचा थाट, पारंपरिक पद्धतीने पार पडला कार्यक्रम, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.