सोमवार, एप्रिल 27, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वर्ष झालं! अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, त्यांच्या आठवणी आजही जिवंत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 14, 2025 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
atul parchure

वर्ष झालं! अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण, त्यांच्या आठवणी आजही जिवंत

atul parchure : मराठी व हिंदी या दोन्ही मनोरंजनसृष्टीत आपलं नाणं खणखणीत वाजवत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजे दिवंगत अभिनेते अतुल परचुरे. आजही त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत आणि पुढेही राहतील. अतुल परचुरे यांचं लहानपण दादरमध्ये गेलं. लहानपणापासूनच त्यांना क्रिकेटची प्रचंड आवड होती. मित्रांसह ते नेहमीच क्रिकेट खेळायचे. खरंतर त्यांना अभिनेता नाही, तर क्रिकेटर व्हायचं स्वप्न होतं. पण काही काळानंतर त्यांना जाणवलं की, या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर खूप मेहनत घ्यावी लागेल आणि ती ते घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांनी क्रिकेटचं स्वप्न बाजूला ठेवलं.

अभ्यासातही त्यांची फारशी आवड नव्हती, पण एक गोष्ट मात्र त्यांना कायम आवडायची ती म्हणजे अभिनय. शालेय नाट्यस्पर्धांमध्ये ते नेहमी भाग घ्यायचे. चौथीत असतानाच त्यांनी पहिल्यांदा टेलिव्हिजनवर काम केलं, आणि नंतर व्ही. शांताराम यांच्या बालचित्रपटातही झळकले. यानंतर काही काळ त्यांनी बँकेत नोकरी केली, जवळपास पाच ते सहा वर्षं. पण नियतीने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. त्यांच्या आयुष्यात मोठं वळण आलं ते म्हणजे ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटक.

आणखी वाचा – अखेर हास्यजत्रेत परतला ओंकार भोजने, पहिला प्रोमो समोर, प्रेक्षकही खुश, म्हणाले, “दिवाळीचा बोनस…”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

या नाटकात त्यांनी साकारलेली पु. ल. देशपांडे यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे. पण ही भूमिका त्यांना मिळाली कशी, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. अतुल परचुरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, “मी तरुण होतो तेव्हा माझं व्यक्तिमत्व आणि दिसणं थोडं पु. ल. सारखं होतं. त्यामुळे ‘व्यक्ती आणि वल्ली’च्या निर्मात्यांनी मला ही भूमिका देण्यापूर्वी, थेट पु. ल. देशपांडेंनाच विचारलं. ही भूमिका अतुलला देता येईल का? आणि पु. ल.नी लगेचच ‘हो’ म्हटलं!” हे ऐकताच अतुल परचुरे यांनीही तत्काळ ‘व्यक्ती आणि वल्ली’साठी होकार दिला आणि तेथून त्यांच्या अभिनय प्रवासाची खरी सुरुवात झाली.

आणखी वाचा – Filmfare मिळताच छाया कदम यांच्या डोळ्यात पाणी, मंचावर शाहरुख खानने दिला धीर अन्…; व्हिडीओ व्हायरल

यानंतर त्यांनी सिनेमा, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांतून उत्कृष्ट कामगिरी केली. विशेष म्हणजे, त्यांनी शाहरुख खानची पहिली निर्मिती असलेला ‘दिल है हिंदुस्तानी’ या हिंदी चित्रपटातही भूमिका साकारली होती. परंतु पुढे त्यांनी कर्करोगाशी कठीण झुंज दिली. पहिली सर्जरी यशस्वी झाली नाही, तरीही त्यांनी हिम्मत सोडली नाही. पण नशिबाने डाव पलटवला आणि १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. आज त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण अतुल परचुरे यांच्या आठवणी, त्यांचा अभिनय, आणि त्यांचं स्मितहास्य आजही प्रेक्षकांच्या मनात तितकंच जिवंत आहे.

Tags: atul parchureatul parchure deathentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
Jui Gadkari

"बोल्ड कंटेंटसाठी कम्फर्टेबल नाही", जुई गडकरी स्पष्टच बोलली, म्हणाली, "हातातून काम निसटतंय…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.