शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आईचं निधन झालं आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाला, “मी गावी गेलो अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 16, 2024 | 4:52 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi actor Kailash Waghmare said that he sees her mother in his daughter know more

"आईचं निधन झालं आणि...", सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' कठीण प्रसंग, म्हणाला, "मी गावी गेलो अन्..."

आई! प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक महत्त्वाची व्यक्ती. ‘आई’ या दोन अक्षरी या शब्दात सारे विश्व व्यापते. मात्र आई सोडून गेल्यावर सारे विश्व नको नको वाटतं. प्रत्येक मुलासाठी आईचं महत्त्व हे अधिकच असतंच. पण आई सोडून गेल्यावर प्रत्येक मुलगा आपल्या आईला बहीण, बायको किंवा मुलीच्या रुपात पाहत असतो. असंच आपल्या आईला मुलीच्या रुपात बघणारा अभिनेता म्हणजे कैलाश वाघमारे. आईच्या निधनानंतर कैलाशने त्याच्या मुलीमध्ये आईला पहिल्याचे म्हटलं आहे. नुकतीच त्याने ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. यामध्ये त्याने त्याच्या आईबद्दल भाष्य केलं.

‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकामुळे कैलाश प्रेक्षकांच्या भेटीला आला. या नाटकाने एक वेगळा विषय रंगभूमीवर मांडला, ज्याचे अनेक यशस्वी प्रयोगही झाले. त्यानंतर कैलाश अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. यावेळी कैलाशने ‘इट्स मज्जा’च्या ‘ठाकूर विचारणार’ मुलाखतीत आपल्या आईविषयी भाष्य केलं आहे. यावेळी अभिनेता आईच्या आठवणीत भावुक झाला.   

आणखी वाचा – Video : स्टेजवर संपूर्ण कुटुंब उभं, मुकेश अंबानींचा नातू पाय घसरुन पडला अन्…; पुढे चिमुकल्याने देवाचं नाव घेताच संस्कारांचं होतंय कौतुक

आईबद्दल बोलताना कैलाशने असं म्हटलं की, “कोविडचा काळ माझ्यासाठी खूपच चांगला होता. पण तेव्हा माझी आईही आजारी होती. ती अगदी शेवटच्या क्षणाला आली होती. त्यामुळे तेव्हा मी प्रचंड द्विधा मनस्थितीत होतो. माझ्या आईबरोबर माझं वेगळंच नातं होतं. ती आजारी होती. तेव्हा मी खूप त्रासात होतो. माझ्यासाठी लॉकडाऊनचा तो काळ वेगळाच होता. तो त्रास मला जाणवलाच नाही. तेव्हा आम्ही गावी होतो. गावाकडे सगळे लोक खेळीमेळीने राहत होतो”.

आणखी वाचा – Video : साडी नेसल्यावर खाली पडलेली वस्तू कशी उचलायची?, प्रसाद ओकच्या बायकोचा Funny Video चर्चेत, कलाकारांनाही हसू अनावर

यापुढे त्याने असं म्हटलं की, “माझी मुलगी अगदीच माझ्या आईसारखी दिसते. तिचे कान, डोळे, गाल आणि तिच्या हाताची बोटं सगळं माझ्या आईसारखच आहे. माझ्या आयुष्यात काही घडलं तर मी ते सगळं माझ्या आईला सांगायचो. आज ते मी माझ्या बायकोबरोबर शेअर करतो, पण आईला सांगण्यात ज्या भावना होत्या त्या मला आता अनुभवता येत नाहीत. माझ्या आईला मी काही सांगितल्यानंतर ती “अरे वा, किती छान, किती मस्त” असं म्हणायची. ते मी आता खूप मिस करतो. माझ्या मुलीला माझ्या प्रत्येक कामाबद्दल जसा आनंद असतो तसंच माझ्या आईला माझा अभिमान होता”.             

Tags: kailash waghmareKailash Waghmare Mothermarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aishwarya Rai Look

बांधलेले केस, विचित्र ड्रेस-मेकअप अन्…; ऐश्वर्या रायच्या फॅशनला झालंय काय?, अंबानींच्या कार्यक्रमात बघून सगळ्यांनाच धक्का बसला आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.