मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हरहुन्नरी अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 22, 2025 | 4:48 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Marathi Actor Death

हरहुन्नरी अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराने निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Marathi Actor Death : मराठी सिनेविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन झाले असल्याचं समोर आलं आहे. वयाच्या ४२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक रणजित पाटील यांच्या निधनाने सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले असल्याचं समोर आलं. निधनानंतर तातडीने त्यांचे शव त्यांच्या मुळ गावी कोल्हापूर येथे नेण्यात आले. कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रणजित हे गेल्या काही वर्षांपासून मराठी मालिका, सिनेमा आणि नाटक विश्वात सक्रीय होते. सध्या रंगभूमीवर सुरु असलेल्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचं दिग्दर्शन रणजीत यांनी केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी एकांकिका स्पर्धांमधून तरुण कलाकारांनाही प्रोत्साहन दिलं. रणजित पाटील यांच्या निधनामुळे मराठी नाटक आणि एकांकिका स्पर्धांमधील आधारस्तंभ हरपल्याची भावना प्रत्येकाच्या नजरेत पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – नोरा फतेहीचा अपघात, मद्यधुंद चालकाला अटक, आता अभिनेत्रीची प्रकृती कशी? ‘तो’ व्हिडीओ समोर येताच व्हायरल

दिग्दर्शनाबरोबर रणजित यांनी ‘हृदयी प्रीत जागते’ या मालिकेत आपल्या अभिनयाची जादू दाखविली. त्यांच्या अंकल या भूमिकेचं भरभरुन कौतुक झालं. रणजित यांच्या निधनाने कलाकार आणि अनेक रंगकर्मी हळहळ व्यक्त करत आहेत.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Jay Dudhane Engagement

'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.