Ankush Chaudhari New Movie : मराठी सिनेइंडस्ट्रीमधील स्टाईल आयकॉन म्हणून अभिनेता अंकुश चौधरी लोकप्रिय आहे. गेल्या काही वर्षात अनेक अभिनेत्यांनी इंडस्ट्रीत एन्ट्री केली, पण अंकुशची क्रेझ, त्याचं स्टारडम मात्र टिकून आहे. अंकुशनं स्वत:च्या मेहनतीच्या, जिद्दीच्या बळावर आपलं नाव कमावलं. अंकुश आजही मराठी इंडस्ट्रीतला सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. विनोदी असो किंवा गंभीर भूमिका त्यानं नेहमीचं प्रेक्षकांचं मन जिंकलंय. याच बळावर त्यानं त्याचा मोठा चाहता वर्गही निर्माण केला आहे. आता चाहत्यांच्या मनावर राज्य करायला अंकुश नव्या कोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून मोशन पोस्टरही समोर आलं आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवणारा, सुपरस्टार अंकुश चौधरी लवकरच एका नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून ९ मे २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “थांब म्हटलं की थांबायचं”, अशी चित्रपटाची टॅगलाईन असल्यामुळे यंदाच्या मे महिन्यात तापमान अधिकच गरम होणार की काय याची भीती वाटू लागली आहे.
आणखी वाचा – अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हातात दोन घड्याळे का घालतात? कारण वाचून व्हाल थक्क
‘व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा’, ‘ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट’ निर्मित विक्रम शंकर प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. समोर आलेल्या या मोशन पोस्टरमध्ये अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतला पी एस आय चा लूक पाहायला मिळत आहे, जो चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण करणारा आहे. तर या चित्रपटाच्या कथेची जबाबदारी लेखक संदीप दंडवते यांनी सांभाळली आहे.
आणखी वाचा – लाडक्या बहिणींवरचे अत्याचार म्हणजेच तुमचा Womens Day का?
अंकुश चौधरी अभिनीत या चित्रपट येत्या ९ मे रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहेत. आशयघन विषय हाताळत अंकुश हा नवा चित्रपट कोणत्या गुन्ह्याला आळा घालणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अंकुशच्या या चित्रपटात आणखी कोणते कलाकार असणार याकडेही साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.