Sharmishtha Raut Divorce : ‘बिग बॉस मराठी’ मुळे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत घराघरांत पोहोचली. सध्या अभिनेत्री निर्मिती क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करताना दिसत आहे. व्यावसायिक आयुष्याबरोबरच शर्मिष्ठा वैयक्तिक आयुष्यामुळे बरीच चर्चेत राहिलेली पाहायला मिळाली. शर्मिष्ठाचे पहिले लग्न अमेय निपाणकर यांच्याशी झाले होते. आणि त्यांनतर त्यांनी २०१८ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर अभिनेत्री बऱ्याच त्रासातून गेली. घटस्फोटादरम्यान आलेलं डिप्रेशन, या सगळ्यातून बाहेर पडत घेतलेला धाडसी निर्णय हा काही काळ तिच्यासाठी फार कठीण होता. याबाबत अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
शर्मिष्ठाने नुकतीच मज्जा पिंक चॅनेलच्या “हीलिंग सर्कल विथ वनश्री” या कर्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी शर्मिष्ठाने तिच्या घटस्फोटादरम्यानच्या काळात तिला हीलिंगमुळे किती मदत झाली याबाबत भाष्य केलं. शर्मिष्ठा म्हणाली, “या पूर्ण प्रवासात माझी एक मेजर जर्नी सुरु होती. मी असं म्हणेन की ही जर्नी ‘बिग बॉस’नंतर १८० डिग्रीमध्ये पूर्णतः बदलली. ‘बिग बॉस’च्या आधी माझी एक जर्नी सुरु होती त्यादरम्यान मी मेडिटेशन करत होते. मी दोन वर्ष डिप्रेशनमध्ये होते”.
आणखी वाचा – “मराठी शाळेची अवस्था…”, अक्षय केळकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला, “माझं कुठेच काहीच अडलं नाही कारण…”
पुढे ती म्हणाली, “मी मेजर डिप्रेशनमध्ये होते. जीव देण्यापासून सगळे विचार माझ्या मनात येऊन गेले होते, प्रयत्न करु का की नको करु. हे जर केलं आणि आपण नाही मेलो तर जे काही अधुत्त्व आधीच आलं असेल तर ते असं शरीर घेऊन आई-वडिलांवर भार घेऊन कसं आणि का जगायचं असंही वाटत होतं. डिप्रेशन म्हटलं की वाटेल ते विचार आपल्या मनात येत असतात. तर याच्यातून काय मार्ग काढायचा हे मला नीटसं कळत नव्हतं. घटस्फोट त्यादरम्यान सुरु होता. त्यावेळी मी माझ्या एक्स नवऱ्यावर १०० ताशेरे ओढले त्याने माझ्यावर ओढले. हे असं गरामगरमीच वातावरण असायचं. पण जसं जसं माझं काऊन्सलिंग होऊ लागलं तेव्हा मी शांत होत गेले”.
शेवटी शर्मिष्ठा म्हणाली, “जेव्हा माझं काऊन्सलिंग सुरु झालं तेव्हा मला असं जाणवलं की, त्या माणसाचा दोष नाही आहे किंवा माझाही दोष नाही आहे. कायम दोन चांगल्या व्यक्ती एकत्र आल्यावर चांगलंच घडेल असं नाही आहे. म्हणून तो माणूस चुकीचा आहे का तर नाही. त्याचं upbringing तसं झालं आहे. काय निर्णय घ्यायचा यासाठी मला हीलिंगची खूप मदत झाली”.





