आपल्या हटके नृत्यशैलीने जी प्रेक्षकांना कायम घायाळ करते ती म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक. मानसी नाईक चा चाहता वर्ग मोठा आहे.

मानसी तिच्या कामासोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी मानसीने नवीन घर घेतलं. त्याच देखील कौतुक होताना पाहायला मिळालं.

PHOTO CREDIT : INSTAGRAM
मानसी नाईक प्रदीप खरेरा याच्या सोबत विवाहबंधनात अडकली होती. त्यांच्या लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता. पंरतु काहीच कालावधीनंतर प्रदीप आणि मानसी एकमेकांपासून वेगेळे झाले. त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत होत्या.

PHOTO CREDIT : INSTAGRAM
याबद्दल मानसीने स्वतः देखील भाष्य केले होते.परंतु सध्या मानसी पुन्हा रिलेशनशिपमध्ये आहे का? यासारख्या चर्चाना उधाण आले आहे. याच कारण असं की मानसीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून रील स्टार तन्मय पाटेकर याच्या ट्रेंडिग गाण्यावरचा एक रील शेअर केला आहे.

PHOTO CREDIT : INSTAGRAM
ऑन डिमांड टुगेदर, रील में और बिग स्क्रीन पे, आम्हला एकत्र बघायला उत्सुक आहेत का? असं कॅप्शन मानसीने या व्हिडिओला दिलं आहे.परंतु या व्हिडीओ वरच्या कमेंट लक्ष वेधून घेत आहेत.

PHOTO CREDIT : INSTAGRAM
अनेकांनी ही जोडी आयुष्यभर साथ राहिली तर खूप चांगलं होईल,वाजवून टाका आता शुभ मंगल सावधान अशा कमेंट केल्या आहेत, मानसी आणि तन्मय एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चाना उधाण आलं आहे.
