Man Dhaga Dhaga New Episode: स्टार प्रवाह वरील अनेक मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात भक्कम स्थान निर्माण केलं आहे.अनेक जुन्या मालिकांसह नवीन मालिका देखील या शर्यतीत जोर धरू लागल्या आहेत.या मालिकांमधून नवीन कथानक, नवीन जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.या जोड्यांची पडद्यावरील केमेस्ट्री देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.(Man Dhaga Dhaga New Episode)
अशीच स्टार प्रवाह वरील, ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. सार्थक व आनंदीच्या जोडीला देखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. वेगळं कथानक, नवीन जोडी ही या मालिकेची जमेची बाजू आहे.साडी स्पर्धा, एकत्र काम यांमुळे आनंदी व सार्थकची वाढती मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे.
पाहा काय घडणार येत्या भागात? (Man Dhaga Dhaga New Episode)
यातच मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे.रेश्मा सार्थकला लग्नासाठी विचारते, त्यावर सार्थक रेश्माला उत्तर देतो, आपण लग्न करण्यासाठी प्रेम असावं लागत. त्यावर रेश्मा सार्थकला म्हणते, डोळे मिटल्यावर ज्या व्यक्तीचा चेहरा दिसतो तेच आपलं प्रेम असत, डोळे बंद कर तुला ही माझाच चेहरा दिसेल. सार्थक डोळे बंद करतो व त्याला आनंदीचा चेहरा दिसतो.आणि याची जाणीव होताच सार्थकला धक्का बसतो.परंतु रेश्माला असा गैरसमज होतो की, सार्थकाला रेश्माचाच चेहरा दिसला आहे त्यामुळे खुश होऊन रेश्मा सार्थकला मिठी मारते.

सार्थकला आनंदीवरच्या प्रेमाची जाणीव होऊन आनंदी व सार्थकच नातं बहरेल का? आनंदी व सार्थकच्या नात्याने प्रेमाचं वळण घेतलं तर रेश्मा या नात्यात कोणते अडथळे घेऊन येणार हे बघणं रंजक ठरणार आहे.
हे देखील वाचा: पुण्याला जाताना दुप्पट टोल घेतल्यामुळे सुप्रसिद्ध अभिनेत्री संतापली, व्हिडीओ नितीन गडकरींनाही केला टॅग, म्हणाली, “हा कुठला नियम?”