‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अभिषेक रहाळकर. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत अभिषेक स्वप्नील जोशीच्या म्हणजेच पट्याच्या भावाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने मालिकेत सौरभची भूमिका साकारली होती. त्या मालिकेत त्याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेनंतर अभिनेता स्टार प्रवाहवरील ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. आपल्या अभिनयाने चर्चेत राहिलेला हा अभिनेता नुकताच तो एका कारणामुळे चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्याचे लग्न. अभिषेक लवकरच विवाहबंधनात अडकणार असून नुकताच त्याचा साखरपुडा सोहळा पार पडला आहे. (abhishek rahalkar engagement)
अभिनेत्री रुमानी खरेने अभिनेत्याच्या साखरपुड्याची बातमी शेअर केली आहे. रुमानी खरेने त्याच्या साखरपुड्याचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे आणि त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रुमानीने “Cuties” असं म्हणत हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिषेक त्याच्या होणाऱ्या पत्नीच्या हातात साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे. गुडघ्यावर बसून त्याने होणाऱ्या पत्नीच्या हातात अंगठी घातली आहे. यावेळी त्याने काळ्या रंगाचा कुर्ता घातला होता तर, त्याची पत्नी कृतिका हिनेही काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. यावेळी दोघांच्या नावापासून बनलेला खास लोगोही पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Oscar Nominations : ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांची नामांकने जाहीर, प्रियांका चोप्राचा ‘हा’ चित्रपटही शर्यतीत
अभिषेक रहाळकर सोशल मीडियावर कायम सक्रीय असतो. तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. अशातच त्याच्या या साखरपुडा सोहळ्याचा हा फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. अभिषेकच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ऋतूजा कुलकर्णी असं आहे. अभिनेता अभिषेक रहाळकरने ‘मन धागा धागा जोडते नवा’ लोकप्रिय मालिकेत काम केले होते. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील सार्थक-आनंदीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. काही दिवसांपूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
आणखी वाचा – “तुझा अभिमान होताच आणि…”, सिद्धार्थ चांदेकरची बायकोसाठी कौतुकास्पद पोस्ट, म्हणाला, “तू लढ…”
दरम्यान, ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत अभिषेकबरोबर अभिनेत्री दिव्या पुगावकर दिसली होती. दिव्याही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. याबद्दल तिने काही दिवसांपूर्वी खास पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर आता याच मालिकेतील अभिषेकचाही साखरपुडा सोहळा पार पडला असून तोही लवकरच विवाहबंधनात अकडणार आहे. त्यामुळे आता दोघांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.