Saif Ali Khan Attacked : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेला हल्ला सध्या विशेष चर्चेत आहे. अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याने सैफ व त्याचे कुटुंबीय काळजीत आहेत. इतकंच नाही तर चाहत्यांमध्येही काळजीच वातावरण पाहायला मिळालं. या घटनेमध्ये सैफला अनेक जखम झाल्या आणि पाठीच्या कण्यावर शस्त्रक्रिया केल्यावर चाकूचा एक तुकडाही बाहेर काढला गेला. पाच दिवस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सैफ अखेर घरी परतला आहे. त्याच वेळी पोलिसांनी आरोपीलाही अटक केली. आता पोलिसांनी सैफ अली खान यांचे निवेदन नोंदवले आहे.
११व्या मजल्यावर असलेल्या सैफ अली खानच्या अपार्टमेंटमध्ये तीन बेडरुम आहेत. ज्यापैकी करीना आणि सैफ एका बेडरुममध्ये राहतात, तैमूर दुसऱ्या खोलीत राहतो ज्याची केअरटेकर गीता देखील तिथे राहते आणि जहांगीर त्याच्या तिसऱ्या खोलीत राहतो तर मदतनीस एलियामा फिलिप देखील तेथे राहतात. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफ अली खानने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, तो आणि त्याची पत्नी करीना कपूर खान ११व्या मजल्यावर त्यांच्या बेडरुममध्ये असताना त्यांनी जहांगीरची आया एलियामा फिलिपच्या किंचाळण्याचा आवाज ऐकला.
त्यांचा आवाज ऐकून सैफ व करीना याच्या खोलीत धावली, जिथे त्यांनी हल्लेखोरांना पाहिले. सैफचा धाकटा मुलगा घटनेच्या वेळी रडत होता आणि जेव्हा अभिनेत्याने हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. सैफच्या तावडीतून स्वत: ला मुक्त करण्यासाठी त्याने चाकूने मानेवर, पाठीवर आणि हातावर हल्ला केला. जखमी झाल्यानंतरही सैफ अली खानने हल्लेखोरांना ढकलले. त्यांनतर त्याने जहांगीरच्या खोलीत हल्लेखोराला लॉक केले आणि घरातील कर्मचारी जेहबरोबर १२व्या मजल्यापर्यंत पळाले.
आणखी वाचा – “तुझा अभिमान होताच आणि…”, सिद्धार्थ चांदेकरची बायकोसाठी कौतुकास्पद पोस्ट, म्हणाला, “तू लढ…”
गोंधळ ऐकून इतर कर्मचारी रमेश, हरी, रामू आणि पासवान खाली आले तेव्हा त्यांना दिसले की, ज्या खोलीला कुलूप लावले होते त्या खोलीत हल्लेखोर नव्हता आणि संपूर्ण घरात शोध घेऊनही तो सापडला नाही. दरम्यान, सैफ अली खानला ऑटोरिक्षातून रुग्णालयात नेण्यात आले.