शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मल्याळम अभिनेत्री निकिता नायरचे निधन, वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, ‘या’ दुर्मिळ आजारामुळे गमावावा लागला जीव

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2025 | 3:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Malayalam actress Nikita Nair passed away at the age of 21

मल्याळम अभिनेत्री निकिता नायरचे, वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी निधन

मनोरंजन सृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे ती म्हणजे एका २१ वर्षीय अभिनेत्रीचे निधन झाले आहे. मल्याळम अभिनेत्री निकिता नायरचे निधन झाले. निकिता ही B.Sc सायकॉलॉजीची विद्यार्थिनी होती. आजारपणामुळे कोची येथील खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला विल्सन रोग नावाचा दुर्मिळ आजार होता. आजारपणामुळे त्यांच्यावर दोनदा यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागली. दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर एका आठवड्यानंतर तिचा मृत्यू झाला. (Nikita Nair passed away)

निकिता तिच्या महाविद्यालयीन जीवनात एक सक्रिय आणि प्रेरणादायी विद्यार्थिनी होती. तिच्या निधनामुळे महाविद्यालयात आणि तिच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे. अनेकांनी तिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तिच्या कुटुंबियांनाही निधनाने मोठा धक्का बसला आहे शिवाय अभिनेत्रीची आई नमिता माधवनकुट्टी आणि वडील डॉनी थॉमस यांनाही लेकीच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे.

आणखी वाचा – सैफ अली खानवरील हल्ल्याच्या प्रश्नाचं उर्वशी रौतेलाने दिलेलं भलतंच उत्तर, ट्रोल होताच म्हणाली, “पंतप्रधान नरेंद्र मोदी…”

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ०८ वाजल्यापासून एडप्पल्ली  नेताजी नगर येथील तिच्या घरी तिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर निकिताच्या पार्थिवावर कोची येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आणखी वाचा – किशोर कुमार व अलका याज्ञिक यांना पद्म पुरस्कार न मिळाल्याने सोनू निगमची नाराजी, म्हणाला, “अनेक दिवसांपासून कला सिद्ध करत आहेत पण…”

दरम्यान, निकीता ही ‘मेरिकुंडोरू कुंजाडू’ चित्रपटातील बालकलाकार आहे आणि सेंट तेरेसा कॉलेजची माजी अध्यक्षादेखील होती. त्यामुळे तिच्या निधनाचे वृत्त येताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत त्यांनी निकिताच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.    

Tags: Malayalam actress Nikita NairMalayalam actress Nikita Nair passed awayNikita Nair passed away
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss OTT 4

Bigg Boss 18 संपताच प्रेक्षकांना लागलीय ओटीटीची ओढ, केव्हा सुरु होणार Bigg Boss Ott 4?, सलमान खान होस्ट करणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.