‘माझा होशील ना?’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. या मालिकेमुळे गौतमी चांगलीच नावारूपाला आली. या मालिकेमुळे तिची बरीच चर्चा रंगली. गौतमी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. गौतमी सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते आणि तिच्या या खास फोटो. व्हिडीओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळतो. आपले अनेक हटके फोटो व व्हिडीओ पोस्ट करत चर्चेत राहणारी गौतमी अनेकदा सोशल मीडियाद्वारे सामाजिक विषयांवरही भाष्य करत असते.
काही दिवसांपूर्वी गौतमीने पाण्याच्या टंचाईबद्दल पोस्ट शेअर करत तिची भूमिका व्यक्त केली होती. “हवामान संकटामुळे दिल्लीतील गरीबांना पाण्याच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे” असं म्हणत “आपण याला जबाबदार आहोत का?” असा प्रश्नही उपस्थित केला होता. अशातच आता गौतमीने मुंबईतील कचऱ्याबद्दल व प्लास्टिकच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एका वर्तमानपत्रातील बातमीचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ‘अबब, किती हे प्लास्टिक’ या शीर्षकाखाली नाल्यातून १.५५ घनमीतर गाळ उपसला असून यात प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे.

गौतमीने हीच बातमी शेअर करत असं म्हटलं आहे की, “बघा आपण आपल्याच पर्यावरणाबरोबर काय करत आहोत. आपण प्लास्टिकचा वापर करतो आणि दुसऱ्यांना अगदी सहज दोष देतो. मी आधीच म्हटल्याप्रमाणे, आपल्याला स्वच्छ आणि आनंदी पर्यावरण ठेवण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या निवडी ठरवाव्या लागतील. कृपया प्लास्टिकचा वापर करणे टाळा”.
दरम्यान, गौतमी व विराजसची ‘माझा होशील ना?’ ही मालिका चांगलीच गाजली होती. यान मालिकेनंतर या दोघांचे ‘गालिब’ हा नाटक रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे. गौतमी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. अशातच तिने नुकतीच शेअर केलेली ही पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.