मराठी चित्रपट सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे जेष्ठ कलाकार महेश कोठारे यांनी आयुष्यात अनेक चढउतार पहिले. मराठी सिनेविश्वातील त्यांचा इतक्या वर्षांचा प्रवास असाच सहज घडला नाही. प्रत्येक यक्ती त्याला येणाऱ्या अनुभवातून शिकत आयुष्यात पुढे जात असते. अशातच वाटेत अनेक प्रकारची लोकं भेटतात. कोणी तुम्हाला योग्य मार्ग दाखवत तर कोणी त्याच मार्गाचा रस्ता अडवण्याचं कामं कामं करत असतं. याच बरोबर तुम्ही जर एखाद्या क्षेत्रात नवीन असाल तर तुम्हाला इतर गोष्टी कळेपर्यंत, त्या नवीन गोष्टीतील अनुभवच खूप आलेले असतात. जेष्ठ अभिनेते महेश कोठारे मालिका विश्वातील निर्मिती क्षेत्रात नवीन असताना त्यांच्या सोबत देखील असाच काही प्रकार घडला होता. या बद्दलची माहिती त्यांनी “डॅमइट आणि बरंच काही” या त्यांच्या जीवन चरित्रात सांगितला आहे. (Mahesh kothare Struggle)

महेश यांनी पछाडलेला आणि खबरदार या दोन्ही चित्रपटांवर भरपूर मेहनत घेतल्यानंतर सुद्धा महेश यांना हवा तेवढा आर्थिक फायदा झाला न्हवता. तेव्हा महेश यांना वाटलं की आपण सुद्धा मालिकांच्या निर्मिती क्षेत्रात उतरावं. त्यावेळेस स्टार प्रवाह ही वाहिनी नवीनच प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तेव्हा त्यांनी “मन उधाण वाऱ्याचे” या मालकीची निर्मिती करायची ठरवली होती. ही मालिका “बौ कोठा काओ” या बंगाली मालिकेचा रिमेक होता आणि ही मालिका आधी स्टार जलसा या वाहिनीवर लागत असे. स्टार प्रवाह वाहिनीचे प्रमुख अतुल केतकर त्यांच्या सोमोर या मालिकेची महेश यांनी कल्पना मंडळी असता त्यांनी यासाठी होकार दिला होता.
हे देखील वाचा: अभिनेता हृषीकेश शेलारच्या मुलीचा नामकरण सोहळा संपन्न, हृषीकेश ने शेअर केलेले सुंदर फोटोज पाहा
या मालिकेसाठी स्टार कॅस्टचा विचार करताना आईच्या भूमिकेसाठी त्यांना पाहिलं नाव वर्षा उसगावकर यांचे सुचले. या मालिकेसाठी अभिनेत्रीची निवड करायची असल्याने महेश यांना अतुल सीधेय यांच्याकडे स्ट्रगल करत असलेल्या काही अभिनेत्री आणि अभिनेत्याचे फोटो मिळाले. त्यातील एक मुलगी महेश यांना या मालिकेसाठी आवडली. योगायोगाने महेश जेव्हा पुण्याला गेले होते तेव्हा त्यांना तीच मुलगी दिसली. फर्ग्युसन या कॉलेज मध्ये ती शिकत असतानाच तिची या मालिके साठी निवड करण्यात आली. काही वेळांनंतर महेश यांना या मालिकेसाठी अभिनेता सुद्धा सापडला आणि या मालिकेचे शूटिंग सुरु झाले.(Mahesh kothare Struggle)

ही मालिका पुढे जाऊन खूप गाजली. परंतु या मालिकेने महेश यांना आर्थिक आघाडीवर मात्र मागे खेचलं. या माध्यमाचा महेश यांना फारसा अभ्यास नसल्याने महेश यांना वाटलं गुंतवलेली सगळी रक्कम महेश यांना परत मिळेल परंतु तसे न होता ज्या रथी महारथींना लेखक दिगदर्शकांना सोबत नेलं होत, त्यांनीच शेवटी महेश यांना खूप त्रास दिला. त्या वाहिनीवरील अनेक मंडळींनी महेश यांना खूप अडचणीत आणलं. अनेक प्रसंग रिशूट करायला सांगितले. या मालिकेसाठी महेश यांनी १० हजार रुप्याचे कर्ज देखील घेतले होते. या मालिकेचा एक भाग प्रदर्शित झाला की कर्ज देणार्याला महेश यांना १ हजार रुपये द्यावे लागायचे. ही मालिका पुढे ३ वर्षात पदार्पण करू शकली असती पण या मालिकेतील कलाकारांनी त्यांचे मानधन वाढवावे असे महेश यांना सांगितले. त्यामुळे महेश यांना ही मालिका बंद करावी लागली.
हे देखील वाचा: या अभिनेत्रीला ओळखलंत का ?रेशीमगाठ मालिकेत साकारलीय खलनायिका
आता महेश त्यांच्या निर्मीतीखाली “सुख म्हणजे नक्की काय असतं ” ही मालिका तयार होत असून अजून देखील महेश कोठारे स्टार प्रवाह सोबत कामं करत आहेत.