मराठी चित्रपट हे त्यांच्या कथेसह शूटिंग व त्यामागे घेतल्या जाणाऱ्या मेहनतीसाठी खास करून ओळखले जातात. या मध्ये एका दिग्दर्शकाच नाव अग्रेसर आहे ते म्हणजे दिग्दर्शक महेश कोठारे. अनेक मराठी चित्रपट, मालिका निर्मित, दिग्दर्शित करून महेश कोठारे यांनी प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. महेश कोठारे यांच्या या प्रवासात अनेक कलाकारांनी त्यांची साथ दिली. कलाकारांच्या या यादीतील आणि महेश कोठारे यांच्या आयुष्यातील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे स्वर्गीय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. आजही या जोडीचे चित्रपट प्रेक्षक तितक्याच आनंदाने बघतात. चित्रपटात अभिनयनासह महेश कोठारे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी देखील लीलया पेलली आणि मराठी मनोरंजन सृष्टीला अनेक हिट चित्रपट दिले. महेश कोठारे यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये धडाकेबाज चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान लक्ष्मीकांत बेर्डे यांची एक धडाकेबाज कामगिरी सांगितली आहे. ‘धडाकेबाज’ चित्रपटातील एक सिन शूट करत असताना घडलेला ‘तो’ प्रसंग लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवावर बेतला असता. जाणून घेऊयात नक्की काय घडलं होतं या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान. (Dhadakebaj Movie Shooting Story)
महेश कोठारे यांची दिगदर्शन करण्याची हटके पद्धत ही त्या काळी अनेक कलाकारांना आवडायची या कलाकारांमध्येच एक होते लक्ष्मीकांत बेर्डे. महेश कोठारे हे नाव घेताच लक्ष्मीकांत बेर्डे हे नाव आपसूक आपल्या तोंडी येतं. महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे धडाकेबाज चित्रपटातील बंदुकीने गोळी मारण्याचा सिन शूट करत होते. या सीनच्या शूटिंग दरम्यान बंदुकीची गोळी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हातातच फुटली व पूर्ण हात रक्तबंबाळ झाला. चित्रपटाच्या कथेप्रमाणे गुंड लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेरतात तेव्हा लक्ष्मीकांत बाटलीत असणारा मित्र म्हणजे गंगारामला बोलवतो आणि गंगारामच्या मदतीने केवळ हाताच्या बोटातून गोळी सुटण्याचा सीन सुरु होतो.
या सीन दरम्यान एक नळी लक्ष्मीकांत यांच्या कॉस्ट्यूममधून त्यांच्या हातापर्यंत ठेवण्याची कल्पना महेश कोठारे यांची होती आणि तसं झालं देखील सीन पूर्ण झाला महेश कोठारे यांनी वेल डन म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांचं कौतुक देखील केलं मात्र लक्ष्मीकांत यांच्या जवळ जाऊन महेश यांनी पाहिलं तेव्हा त्यांना समजलं नळीतून सुटलेली गोळी ही लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हातातच फुटली मात्र त्यांनी काही कळू न देता सीन सुरू ठेवला. महेश कोठारे यांना हे समजताच त्यांचे डोळे पाणावले. महेश कोठारे तात्काळ दवाखान्यात घेऊन गेले आणि त्यांच्यावर योग्य ते उपचार केले. (Dhadakebaj Movie Shooting Story)
हे देखील वाचा- Video : करिश्मा कपूरच्या लग्नात करीना कपूरने पदराने लपवलेलं तोंड, करवली म्हणून मिरवतानाचा ‘तो’ जुना व्हिडीओ समोर
या घटनेवरून महेश कोठारे यांच्या धडाकेबाज चित्रपटाच्या यशामागे लक्ष्मीकांत बेर्डे या खऱ्या धडाकेबाज कलाकाराचा हात होता हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. महेश कोठारे व लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘धडाकेबाज’, ‘दे दणा दन’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनांनंतर महेश कोठारे यांच्या आयुष्यतील लक्ष्मीकांत यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही असं महेश यांची अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे.