महेश कोठारे या नावाचा एक वेगळा दबदबा सिनेसृष्टी मध्ये पहायला मिळतो. दिग्दर्शक, निर्मता, अभिनेता अशा अनेक धुरा त्यांनी आजवर उत्तम सांभाळल्या आहेत. अनेक दर्जेदार एव्हरग्रीन चित्रपट, मालिका त्यांनी प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. आणि अजूनही ते प्रेक्षकांच्या निखळ मनोरंजनाचं काम प्रामाणिकपणे करत आहेत.दिग्दर्शकाच्या रूपात त्यांना पाहिलं, नट म्हणून कसे आहेत यासर्व गोष्टी अनेक मुलाखतींमधून प्रेक्षकांच्या समोर येतच असतात. एखादा चित्रपट कसा घडला, एखाद्या चित्रपटाच्या अपयशाचं कारण काय, पडद्यामागची गोष्ट हे सर्व समोर येण्यासाठी आत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुलगा ही सिनेक्षेत्रात असल्यामुळे वडील म्हणून त्यांची असणारी ती भावनिक बाजू ही प्रेक्षकांच्या समोर येत असते. आता सोशल मीडियामुळे नातं आणि आजोबांचं नातं ही पाहायला मिळत. (Mahesh Kothare And Wife)
परंतु आज आपण या क्षेत्राकडे वळण्याचा त्यांचा निर्णय कसा ठाम झाला या विषयी जाणून घेऊ ,महेश कोठारे आणि नीलमा कोठारे यांचं अरेंज मॅरेज आहे,महेश करिअर आणि लग्न या द्विधा मनस्थितीत होते, तेव्हा त्यांच्या डॅडीनी त्यांना समजावलं की, जबाबदारी पडली की सगळं सांभाळून घेता येत.तेव्हा नीलिमानं बघायला महेश तयार झाले.परंतु त्यांनी घरच्यांना सांगितलं होत की मुलगी नाही आवडली तर ,मी सरळ उठून निघून येणार, पण पाहतच क्षणी नीलिमा त्यांना आवडल्या आणि लग्नाच्या दृष्टीने त्यांनी पाहिलेली हे फर्स्ट अँड लास्ट मुलगी.
पाहा काय होत महेश कोठारेंच्या पत्नीचं स्वप्न (Mahesh Kothare And Wife)
गुढीपाडव्याला त्यांचं लग्न ठरलं, आणि ११ डिसेंबर १९८० मध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला.पंरतु लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत त्यांना एकमेकांना ओळखण्यासाठी सात ते आठ महिन्यांचा वेळ मिळाला. ते खूप फिरायचे, गप्पा मारायचे या काळात ते एकमेकांना इतके ओळखायला लागले की, न बोलता ही त्यांना कळायचं की समोरच्याला काय बोलायचं आहे. एके दिवशी त्या दोघांच्या छान गप्पा सुरु होत्या. तेव्हा नीलिमा कोठारेंना म्हणाल्या,’तू वकिली केलीस तरी मला चालेल’ पण तू सिनेमा क्षेत्रातच जावं अशी माझी इच्छा आहे.

माझ्या मनातली आणखी एक गोष्ट तुला सांगू का? त्यावर कोठारेंना आश्चर्य वाटलं, त्यांना वाटलं की नीलिमाच्या मनातल्या बऱ्याच गोष्टी मला समजतात, ही अशी कोणती गोष्ट आहे जी मला कळाली नाही, त्यामुळे नीलिमा काय सांगणार याविषयी कोठारेंना फार उत्सुकता होती.तेव्हा नीलिमा म्हणाल्या, ‘महेश, ‘फिल्मफेअर’ ची ट्रॉफी घेताना मला तुला पाहायचं आहे.तो काळ फक्त फिल्मफेअर चा होता. या पुरस्काराची काळी बाहुली मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न असायचं. पण त्यांच्या आधी हे स्वप्न त्यांच्या बायकोने त्यांच्यासाठी पाहिलं होत,त्यांचं हे वाक्य ऐकून चित्रपट क्षेत्रातच पुढे करिअर करण्याचा त्यांचा निर्णय अधिक ठाम आणि पक्का झाला. (Mahesh Kothare And Wife)

हे देखील वाचा : आमिरचा सल्ला ऐकला असता तर चित्रपट हिट ठरला असता
आणि लग्नाच्या अवघ्या पाचच वर्षात कोठारेंनी पत्नीचं हे स्वप्न पूर्ण केलं. १९८५ साली धूम धडका या त्यांच्या चित्रपटासाठी फिल्मफेअर चा अवॉर्ड मिळवला. तसेच पत्नीचं सिनेमाक्षेत्रातच काम करावं ही इच्छा देखील त्यांनी आजतागायत यशस्ववीपणे पूर्ण केली.वकिलीचा पर्याय असताना देखील नवऱ्याने या अस्थिर क्षेत्रात जावं तेवढा विश्वास त्याच्या बदल असणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी स्वप्न बघणं आणि ती पूर्ण करण्यासाठी त्याच्या बरोबरीने उभं रहाणं यासाठी एक वेगळं धैर्य लागत आणि नीलिमा आजवर मागे हटलेल्या नाहीत. एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते हे शब्द त्यांनी सार्थ ठरवले.