शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या दिवशी ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींना मिळणार भरपूर लाभ, लग्नाचाही आहे योग, जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 7, 2024 | 1:07 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Mahashivratri 2024 is going to be special for these five zodiac signs see the details

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या दिवशी 'या' पाच राशींच्या व्यक्तींना मिळणार भरपूर लाभ, लग्नाचाही आहे योग, जाणून घ्या...

Mahashivratri 2024 : उद्या साजऱ्या होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. संपूर्णं देशभरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे आजपासूनच सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातच उद्याची शिवरात्री ही खूपच खास असणार आहे. कारण उद्याच्या महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, सिद्धी योग व शिवयोग अशा तीन प्रभावशाली शुभ योगांचा महासंगम होणार आहे. तसेच या दिवशी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे मंगळ दोष दूर करण्यासाठीही हा सण अत्यंत प्रभावी मानला जातो. त्यामुळे ज्या लोकांच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे त्यांना भगवान शंकराची पूजा करून विशेष लाभ मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया उद्याच्या महाशिवरात्रीला शंकर भगवान कोणत्या ५ राशींचे भाग्य उजळणार आहे.

मेष : मेष राशीच्या लोकांना भगवान शिव तसेच शनीचा विशेष आशीर्वाद मिळेल. प्रदीर्घ व अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. तसेच व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक संकटातून दिलासा मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल. वारिष्ठांकडून सहकार्य मिळेल.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना या वर्षी महादेवाच्या कृपेने इच्छित जीवनसाथी मिळेल. तुमच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. उद्या वाहने आणि जमीन खरेदी करू शकता. तसेच उद्या काही मोठी कामेही पूर्ण होतील. कुटुंबातील विवाहयोग्य व्यक्तीचे लग्न निश्चित होऊ शकते.

आणखी वाचा – बायकोला पुरस्कार मिळताच प्रसाद जवादेचा आनंद गगनात मावेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, “बायको…”

तूळ : तूळ राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तसेच या वर्षी तुमच्या कुटुंबात नवीन सदस्य सामील होऊ शकतात. कुटुंबात आनंद राहील आणि जीवनात शांती वाढेल. ज्यांना दीर्घ काळापासून परदेशात जाऊन पैसे मिळवायचे आहेत त्यांच्यासाठी नवीन मार्ग खुले होऊ शकतात.

मकर : मकर राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीचा हा सण खूपच खास असणार आहे. ऑफिसमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू भक्कम होईल आणि जे नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नोकरीनिमित्त लवकरच खुशखबर मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही पैशाची चांगली बचत करू शकाल. तसेच यावर्षी तुम्ही स्वतःसाठी कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

आणखी वाचा – जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग, काही महिन्यांपूर्वीच खरेदी केलं होतं अलिशान घर, अभिनेत्रीच्या घराचं नुकसान?

कुंभ : कुंभ राशीच्या लोकांवर शनीचा विशेष आशीर्वाद मिळेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ते यशस्वी होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुमच्या करिअरशी संबंधित अनेक योजना यशस्वी होतील. लग्नासाठी चांगला प्रस्ताव येऊ शकतो. कुटुंबात सुख-शांती राहील आणि पुढील आयुष्य शांततेत व्यतीत होईल.

Tags: मनोरंजन बातमीमकरमराठी राशी बातमीमराठी बातमीमहाशिवरात्री २०२४मेषकुंभतूळवृषभAquariusAriesCapricornentertainment newsLibraMahashivratri 2024Marathi newsMarathi Zodiac NewsTaurus
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Latest Designer Blouse Collection

Video : स्वस्तात मस्त डिझाइनर ब्लाऊज फक्त ५०० रुपयांपासून दादरमध्ये कुठे मिळणार?, नववधूसाठी तर कमी पैशांमध्ये डिझाइनर लूक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.