‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. शिवाय कार्यक्रमामधील अनेक कलाकार त्यांच्या विनोदी शैलीमुळे प्रकाश झोतात आले आहेत. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्यातीलच एक कलाकार म्हणजे प्रभाकर मोरे. (Prabhakar More Daughter)
प्रभाकर मोरे यांनी आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवलं. त्यांनी मंचावर सादर केलेलं प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. त्यांच्या कोकणी बोलीभाषेमुळे त्यांना ‘चिपळूणचा पारसमणी’ म्हणूनही संबोधले जाते. त्यांची कोकणी बोलीभाषा अनेकांना भावते. इतकंच नव्हे तर शालू या त्यांच्या गाण्याचे जगभरात चाहते आहेत. अनेकदा कार्यक्रमांमध्येही प्रभाकर यांच्या शालूची झलक पाहायला तुडुंब गर्दी पाहायला मिळते. प्रभाकर मोरे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. निरनिराळे फोटो व व्हिडीओ पोस्ट करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात.
प्रभाकर त्यांच्या कामाबरोबरच कुटुंबालाही अधिकाधिक वेळ देताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रभाकर यांनी कुटुंबाबरोबरचेही काही फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर करत असतात. प्रभाकर यांची मुलगीही अगदी गोड दिसते. नुकत्याच झालेल्या कन्यादिनानिमित्त प्रभाकर यांनी त्यांचे लेकीबरोबरचे खास फोटो शेअर केलेले दिसले. या फोटोंवरुन त्यांचं व लेकीचं खास बॉण्ड पाहायला मिळतं. प्रभाकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता त्यांची लेकही अभिनयक्षेत्रात रुजू झाली आहे.
प्रभाकर हे मूळचे रत्नागिरीतील आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. त्यांनी सुप्रसिद्ध निर्माते आणि लेखक संतोष पवार यांच्या नाटकांतून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. त्यांनी आतापर्यंत अनेक नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.