रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे लेकीबरोबर पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन, पोस्ट शेअर करत म्हणाले, “पहिलाच प्रोजेक्ट आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 10, 2023 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prabhakar More On Daughter

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे लेकीबरोबर पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रीन, पोस्ट शेअर करत म्हणाले, "पहिलाच प्रोजेक्ट आणि…"

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर साऱ्यांना भुरळ घातली आहे. जगभरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. या कार्यक्रमातील कलाकाराने स्वतःची ओळख निर्माण करत स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यापैकीच एक म्हणजे हास्यवीर प्रभाकर मोरे. (Prabhakar More On Daughter)

प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या कोकणी बोलीभाषेने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रभाकर मोरे यांचे आगळेवेगळे पात्र रसिक प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडते. हास्यजत्रेतून ‘चिपळूणचा पारसमणी’ म्हणून ओळख मिळवणारे अभिनेते प्रभाकर मोरे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त नृत्य शैलीमुळे चर्चेत असतात. प्रभाकर मोरे यांचा शालू डान्स जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही प्रभाकर मोरे नेहमीच सक्रिय असतात.

आणखी वाचा – हॉस्पिटलमध्ये बर्थडे साजरा केला अन्….; मेघा घाडगेच्या वाढदिवसानिमित्तच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “मला…”

View this post on Instagram

A post shared by Prabhakar More (@its_prabhakarmore)

प्रभाकर मोरे त्यांच्या कामाबरोबरचं कुटुंबालाही अधिकाधिक वेळ देताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रभाकर यांनी कुटुंबाबरोबरचे काही फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर देखील केले आहेत. यांनतर आता प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रभाकर यांनी शेअर केलेली ही पोस्ट खास आहे. कारण या पोस्टवरून त्यांची लेकही अभिनयक्षेत्रात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “‘परदा’ लघुपट. माझ्या लेकीचा पहिलाच प्रोजेक्ट आणि तो ही माझ्याबरोबर. खूप अभिमान वाटत आहे” असं कॅप्शन देत त्यांनी लेकीबरोबर पहिल्यांदा स्क्रीनवर झळकणार असल्याचं सांगितलं.

आणखी वाचा – प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचे न्यूड फोटोशूट चर्चेत, हिमालय पर्वतरांगामध्ये कपड्याविना काढले फोटो, पोस्ट शेअर करत म्हणाला, “गेली १४ वर्ष…”

प्रभाकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्यांची लेक स्क्रीनसमोर उभी असलेली दिसत आहे. तर स्क्रीनवर बाप लेक सीन करताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रभाकर मोरे व त्यांच्या लेकींना शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: entertainmentmaharashtrachi hasyjatramhjprabhakar moreprabhakar more daughter
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Sydney Sweeney To Launch Soap 
Lifestyle

ऐकावं ते नवलंच! स्वतःच्या अंघोळीच्या पाण्याने साबण बनवून विकते प्रसिद्ध अभिनेत्री, किंमत ऐकून सगळ्यांनाच बसला मोठा धक्का

मे 31, 2025 | 2:00 pm
ashok saraf padma shri
Entertainment

“माझा अपघात झाला तेव्हा…”, पद्मश्री प्राप्त झाल्यानंतर अशोक सराफांचा कठीण काळाबाबत खुलासा, म्हणाले, “लोकांनी तर…”

मे 31, 2025 | 12:57 pm
Next Post
Namrata Sambherao On Rohit Mane Wife

"सावत्या म्हणतो…", बायकोला उखाणा घ्यायला सांगताच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेला फुटला घाम; व्हिडीओ चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.